सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज मंगळवारच्या आलेल्या अहवालानुसार 244 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज मंगळवारी आलेल्या अहवालात एकूण 1 हजार 798 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 554 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 244 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 152 पुरुष तर 92 महिलांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याशिवाय नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अलीपूर रोड बार्शी येथील 86 वर्षीय पुरुष, लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील 58 वर्षाची महिला, चांदगुडे गल्ली करमाळा येथील 90 वर्षाची महिला, हराळवाडी (ता. मोहोळ) येथील 64 वर्षांचे पुरुष, बागवान चौक मोहोळ येथील 45 वर्षाचे पुरुष, कुरुल (ता. मोहोळ) येथील 63 वर्षाचे पुरुष, सुतार नेट बार्शी येथील 59 वर्षाची महिला, स्टेशन रोड पंढरपूर येथील 74 वर्षाची महिला तर अलीपूर रोड बार्शी येथील 75 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 229 एवढी झाली आहे.
कोरोनामुळे रुग्णालयात अद्यापही 2 हजार 865 जण उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन 5 हजार 31 जण घरी सुखरुप पोचले आहेत.