● दर्ग्याला जाताना शेळगी जवळ झाला अपघात
सोलापूर : शहरातील शेळगी परिसरातील महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर आलेल्या मालट्रकने समोरून रेणार्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षातील एक युवती गंभीर जखमी होऊन मरण पावली तर इतर सात जण जखमी झाले. हा अपघात आज शुक्रवारी (ता. 2) दुपारी दोनच्या सुमारास झाला. Solapur. One killed in goods truck-rickshaw collision; Eight people were injured in the accident
मिसबा शुकूर मुलाणी (वय-14,) असे मरण पावलेल्या युवतीचे नाव आहे. तर मुजीर पठाण (वय 24), रुकसाना (वय 50), जन्नत, मोहम्मद साद (वय 7), हसीना (वय 7), गुड्डो मन (वय 5), नौशाद (वय 32, सर्व रा. सोलापूर) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातात मिजबा शुकूर मुलाणी या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे तर इतर आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (शासकीय रूग्णालयात) उपचार सुरू आहेत.
कोरबू कुटुंबीय हे मित्र नगरहून शहापुरअली दर्गा येथे जात होते. त्यावेळी परमशेट्टी मिल चौक परिसरात समोरून येणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी होऊन दुसऱ्या बाजूला गेली. यात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात जखमी झालेल्यांना नागरिकांनी दुचाकी व दुसऱ्या रिक्षाने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
हे सर्व जखमी व मयत हे सर्वजण आज दुपारी एमएच 13 एएफ 2209 या क्रमांकाच्या रिक्षातून शेळगी येथील कुमारस्वामी नगर येथून शाहजहूर अली दर्गा येथे दर्शनासाठी जात होते. परमशेट्टी मिल चौक ते पुणे – हैद्राबाद महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरून रिक्षा जात असताना अॅग्रो मिलच्या पाठीमागे समोरून आलेल्या एमएच 43 बीपी 8788 क्रमांकाच्या मालट्रंक चालकाने मालट्रक भरधाव चालवून रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षा पूर्णपणे चिमटली गेली असून रिक्षातील सर्व प्रवासी हे रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागीच सोडून पळून गेला. तर यावेळी जोडभावी पेठ पोलिसांनी तसेच जमलेल्या नागरिकांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले.
रुग्णालयात उपचार सुरु असताना मिसबा मुलाणी ही युवती मरण पावली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ही घटना शेळगी व अपघातग्रस्त नातेवाईकांना कळल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सिव्हिल मध्ये एकच गर्दी केली होती.
● नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ नेले रुग्णालयात
या अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात आणण्याकरिता वेळेत ॲम्बुलन्स उपलब्ध न झाल्यामुळे उपस्थित तेथील नागरिकांनी रिक्षा व दुचाकीच्या माध्यमातून जखमींना थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे प्रहार संघटनेचे जमीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दुचाकी व रिक्षा थेट ओपीडीमध्ये नेऊन रुग्णांना तात्काळ उपचाराकरिता टेबलवर घेतले. डॉक्टरांनी सुद्धा या ठिकाणी तत्परता दाखवली.