Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 28 डिसेंबरला पुण्यात अधिवेशन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 28 डिसेंबरला पुण्यात अधिवेशन

Surajya Digital
Last updated: 2022/12/03 at 5:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ साहित्यिकांना जीवन गौरव पुरस्कार : शाहू महाराज, शरद पवारांची उपस्थितीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ साहित्यिकांना जीवन गौरव पुरस्कार : शाहू महाराज, शरद पवारांची उपस्थिती

 

सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त पुण्यामध्ये एक दिवशी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये चर्चासत्र आणि थोर साहित्यिकांचा गौरव केला जाणार आहे. या अधिवेशनासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली. Sambhaji Brigade’s Silver Jubilee Year Convocation Literary Lifetime Achievement Award at Pune on 28th December

संभाजी ब्रिगेड या सामाजिक संस्थेची १९९७ रोजी स्थापना झाली २०२२ मध्ये २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षा निमित्त एक दिवसीय अधिवेशन भरवण्यात येणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सदरचे अधिवेशन बुधवारी (ता. 28 डिसेंबर) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. उद्घाटनाचे सत्र झाल्यानंतर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. पहिल्या सत्रामध्ये संवाद बहुजन समाजाची या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. विविध जाती धर्मामध्ये विविध प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या सर्व नेत्यांना या चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.

दुसरे चर्चासत्र सुध्दा आरक्षणातून ‘अर्थकारण’ या विषयावर घेतले जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने मोठी चळवळ उभी केली. मात्र आरक्षण काही गेली ४० वर्षे झाले मिळाले नाही. १०३ वी घटना दुरुस्ती झाली मात्र लागू झालेल्या आरक्षणदेखील मिळालंले न्यालयालाने रद्द केले. त्यामुळे आरक्षणाचा लढा कितपत यशस्वी झाला याचा मागोवा घेऊन आरक्षणातून अर्थकारण या विषयावर चर्चा सत्र होणार आहे.

सध्या जागतीकरण वाढत आहे. सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण केले जात आहे. त्यामुळे ‘आरक्षण मिळून काय उपयोग’ याबाबत चर्चा केली जाणार आहे. याचा विचार करता जगभर उद्योग आणि शिक्षणासाठी गेले पाहिजे याबाबत प्रबोधन या चर्चासत्रामध्ये केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडने शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालवावा. आ. ह. साळुंखे, जयसिंगराव पवार यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

TAGGED: #SambhajiBrigade #SilverJubilee #Year #Convocation #Literary #LifetimeAchievement #Award #Pune #28thDecember, #शरदपवार #शाहूमहाराज #जीवनगौरव #पुरस्कार, #संभाजीब्रिगेड #रौप्यमहोत्सव #वर्षानिमित्त #28डिसेंबर #पुणे #अधिवेशन #साहित्यिक #सन्मान #चर्चासत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहा वर्षे झाले असेल तर आधारकार्ड अद्ययावत करा अन्यथा लाभ मिळणार नाही
Next Article औकातित रहा… खासदार निंबाळकर व आमदार पाटलांमध्ये हमरीतुमरी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?