Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजीनामा दे म्हणून सरपंचाला मारहाण; महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

राजीनामा दे म्हणून सरपंचाला मारहाण; महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2022/12/04 at 10:37 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ दुचाकीच्या अपघातामधील वृद्धाचा मृत्यूस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ कासेगाव येथे ८६ हजाराचे दागिने पळविले

सोलापूर – पूर्वीचे भांडण आणि सरपंच पदाचा राजीनामा द्यावा या कारणावरून घेरडी येथील सरपंचास लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. ही घटना सांगोला येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. Sarpanch beaten to resign; Crime against 5 people including woman Sangola Solapur

 

या संदर्भात यशवंत दगडू पुकळे (वय ४२ रा.घेरडी ता.सांगोला) या सरपंचांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी बिरा पुकळे,अनिल मोठे, दिलीप मोठे, दगडू पुकळे आणि सखुबाई पुकळे (सर्व रा.घेरडी) अशा ५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

घेरडी येथील सरपंच यशवंत पुकळे हे शुक्रवारी दुपारी राजेंद्र मोठे यांच्यासोबत सांगोला येथील तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी पूर्वीचे भांडण आणि सरपंच पदाचा राजीनामा दे, नाही तर तुला सोडत नाही. असे म्हणत त्यांना लाथाबुक्याने मारहाण केला. भांडण सोडवण्यासाठी राजेंद्र मोठे मध्ये पडले असता सखुबाई पुकळे या महिलेने त्यांना चप्पलने मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली. फौजदार ननवरे पुढील तपास करीत आहेत.

□ दुचाकीच्या अपघातामधील वृद्धाचा मृत्यू

 

दोड्डी (ता.दक्षिण सोलापूर) ते सोलापूर असेल दुचाकीवरून येताना उदगीरी पेट्रोल पंपाजवळ विजेच्या खांबाला धडकून जखमी झालेले अर्जुन राम चव्हाण (वय ६० रा.दोड्डी ता.दक्षिण सोलापूर) हे शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शुक्रवारी सायंकाळी मरण पावले.

शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून जयाबाई काळे (वय ३०) त्यांच्या तीन मुली मेघा (वय ८) भाग्यश्री (वय ६) आणि वैभवी काळे ( वय नऊ महिने सर्व रा. दोड्डी) यांच्यासोबत सोलापूरकडे निघाले होते. त्यावेळी हा अपघात घडला होता. सर्व जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ कासेगाव येथे ८६ हजाराचे दागिने पळविले

 

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे राहणाऱ्या शिवमाला भीमसेन कोळी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने रोख रकमेसह ८६ हजाराचे दागिने पळविले.

ही चोरी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरट्याने दरवाजाचा कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आणि कपाटातील १९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ हजार रुपये असा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी तालुका पोलिसात दाखल केली. फौजदार बनसोडे पुढील तपास करीत आहेत.

 

□ चिंतलवारवस्ती येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – मोदी खाना परिसरातील चिंतलवार वस्तीत राहणाऱ्या राहुल भिमण्णा व्हनकळस (वय २३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

ही घटना काल शनिवारी सकाळी उघडकीस आली. राहुल व्हनकळस याचा मृतदेह सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. महिला हेड कॉन्स्टेबल सुपे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Sarpanch #beaten #resign #Crime #people #woman #Sangola #Solapur, #राजीनामा #सोलापूर #सांगोला #घेरडी #सरपंच #मारहाण #महिला #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात झाला अनोखा विवाह; एकाच मंडपात तरुणाने केले जुळ्या बहिणींसोबत लग्न
Next Article चिमणीचा विमानसेवेला अडथळा वाटत नाही; सुरू असलेला वाद निरर्थक : माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?