□ कन्नड भाविकांसाठी पंढरपूर, तुळजापुरात कन्नड भवनासाठी निधी
सोलापूर / बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर येथे कर्नाटक भवन बांधण्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत. गोवा, केरळसह सोलापुरमध्ये कर्नाटक भवन उभारणार असे बोम्मईंनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात सीमावादावरुन संघर्ष उफाळून आला आहे. बोम्मई यांनी जत भागात पाणी सोडले होते आणि आता कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा याने आणखी संघर्ष होण्याची शक्यता आहे. 10 milions per Karnataka Bhavan a Solapur; El ministre en cap Bommaini va tornar a fer la broma de Maharashtra
सोलापूर, गोव्यासह केरळमधील कासरगोडमध्ये कन्नड भवन निर्मितीसाठी प्रत्येक १० कोटी निधी देण्यात येईल. कर्नाटकातील भाविकांसाठी पंढरपूर, तुळजापूर, श्रीशैल, अय्यप्पा देवालय आदी ठिकाणी यात्री निवासी केंद्राची स्थापना केली जाईल, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी केली.
बेळगावातील रामदुर्ग (जि. बेळगाव) येथे ६७१.२८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना चालना व कोनशिला बसविण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोम्मई बोलत होते. सीमा भागाच्या जिल्ह्यांतील १८०० ग्रामपंचायतींच्या संपूर्ण विकासाचे काम सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, गोवा, केरळ, तेलंगणा राज्यांच्या सीमेवरील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शेजारी राज्यातील सीमावर्ती भागातील शाळांसाठीही अनुदानाची तरतूद करण्यात येईल, असेही बोम्मई यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न दाव्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून जोरदार हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात तणावस्थिती उद्भवली आहे. या साऱ्या घडामोडीमुळे कर्नाटकाचे नेते चांगलेच बिथरले आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र विरोधात बोलणे सुरू केले आहे. कन्नड भाषकांचा विकास व रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. कन्नड भाषक देशातील कोणत्याही भागात किंवा कोणत्याही राज्यात असले तरी त्यांचे रक्षण आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 कर्नाटकात जायचे तर जावा पण जाहिरातबाजी नको
सोलापूर : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातील २८ गावांनी कर्नाटक सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तसा ठरावही या गावांनी संमत केला आहे. यावर भाजपाचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी संताप व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाणपासून अनेक मान्यवरांनी या मराठी भूमीची सेवा केली आहे. या मातृभूमीला लाथाडून आम्ही जातो असे म्हणताय जावा, पण त्याची जाहिरात बाजी करू नका, आईवर हात उगारू नका असे त्यांनी म्हटले आहे.
आम्हाला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आम्हाला नीटनिटके रस्ते देखील मिळालेले नाहीत. सातत्याने आम्हाला डावलले जात आहे, असे म्हणत गावकऱ्यांन कर्नाटक सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यापैकी काही गावात कर्नाटकचे झेंडेही फडकले.
दरम्यान राज्याचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे हे गुरुवारी (ता. 1 डिसेंबर) जिल्हा परिषदेमध्ये आले असता पत्रकारांनी त्यांना या विषयावर प्रतिक्रिया विचारली. त्यांनी सीमावर्तीय भागातील नागरिकांच्या भूमिकेवर चांगलाच संताप व्यक्त केला. अलमट्टीच पाणी सातत्याने महाराष्ट्राला त्रास देत आहे. आम्ही सहन करतोय, सख्खे भाऊ पक्के वैरी असल्याचे भासवताहेत.
कधी नांदेड बॉर्डर, कधी अक्कलकोट बॉर्डर तर कधी जत बॉर्डर उठून उभे राहते. ‘आमचं पाणी द्या नाहीतर आम्ही महाराष्ट्र सोडून जाऊ’ मात्र एवढा महाराष्ट्र लेचापेचा नाही. तुम्हाला कर्नाटकात जायचे तर जावा पण जाहिरात बाजी करू नका, असे ढोबळे संतापून म्हणाले.