अकलूज / सोलापूर : माळेवाडी अकलूज येथे एकाच वेळी दोन वधुशी लग्न केल्याप्रकरणी वराविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अकलूज पोलिसांनी 1960 च्या कलम 494 नुसार व्दि भार्या प्रतिबंधक कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. Solapur. Finally, a case was filed against the groom along with the twin brides; What the law says Akluj Malshiras
याबाबत अकलूज पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार माळेवाडी अकलूज येथील हाॅटेल गलांडे येथे शुक्रवार ( दि. 2 डिसेंबर) दुपारी 12:30 वा.गट नं 2 ता.माळशिरस येथील अतुल आवताडे याने डोंबिवली मुंबई येथील रिंकी व पिंकी (वय 36) या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह करून व्दिभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले.
त्यामुळेच माळेवाडी अकलूज येथीलच राहुल फुले या युवकाने अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. यावरून अकलूज पोलिसांनी अतुल आवताडे यांच्या विरुद्ध अदखलपात्र (एन.सी) गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत.
जुळ्या बहिणींनी केले एकाच मुलाशी… लग्न मुंबईतल्या कांदिवलीतील दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याची बातमी काल वा-यासारखी व्हायरल झाली. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आयटी इंजिनिअर असून एकाच कंपनीत काम करतात. या दोघींचे नातेवाईक सोलापुरात अकलूजमधील आहेत.
या जुळ्या दोघींच्या सवयीसुद्धा एकसारख्या आहेत. इतकेच काय तर एकीला त्रास झाल्यास तो दुसरीलासुद्धा जाणवतो. त्यांनी विवाह केलेला तरुण अतुल हा अंधेरीत राहतो. दोघींपैकी एकीचे अतुलवर प्रेम जडले. पण दोघी वेगळ्या राहू शकत नसल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अकलूज – वेळापूर रस्त्यावरील अकलूज आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या हॉटेल गलांडे येथे मंगळवारी ( 2 डिसेंबर) दुपारी साडेबारा वाजता हा अनोखा व अविस्मरणीय विवाह सोहळा अगदी थाटात पार पडला. वधू पिंकी आणि वर अतुल हे दोन्ही कुटुंब मुंबईतील आहेत. मुलगा अंधेरीचा तर मुलगी कांदिवली येथील आहेत. त्यांचे नातेवाईक माळशिरस तालुक्यातील आहेत.
या अनोख्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आली होती. त्याचे हळदी व विवाह समारंभाचे फोटोही सोशल मोडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे अनेक मुलांना विवाहासाठी एक मुलगी मिळत नसताना या पठ्ठ्याने मात्र एकाच वेळी दोन मुलीबरोबर लग्न केल्यामुळे हा लग्न सोहळा माळशिरस तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
● कसे जुळले, दोघींनाही का लग्न करावे लागले ?
रिंकी आणि पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणी आपल्या वडिलांच्या पश्चात विधवा आईसह मुंबईत एकत्र राहत होत्या. या काळात आईसह दोन्ही जुळ्या बहिणी आजारी पडल्या होत्या. त्यावेळी अतुलने रूग्णालयात दाखल केले होते. टॅक्सी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या अतुलने दोन्ही रिंकी आणि पिंकीसह त्यांच्या आईला आजारपणात केलेली मदत मोलाची होती. तसेच, घरात पुरूष नसल्यामुळे अतुल आधार बनला होता. दरम्यान, या दोन्ही जुळ्या बहिणींपैकी एकीचा अतुलवर जीव जडला.
हीच बाब दुसऱ्या बहिणीच्या लक्षात आली. मात्र, दोघी वेगळ्या राहू शकत नाहीत ही त्यांची अडचण. एकीने अतुलशी विवाह केल्यास दुसरीचे जगणे मुश्किल होणार होते. म्हणून दोघींही अतुल याच्याशी एकत्रित विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आईनेही दोन्ही जुळ्या मुलींच्या भावना लक्षात घेत आणि अतुलची सेवाभावी वृत्ती विचारात घेत त्या दोघींचा एकट्याशी विवाह करण्यास संमती दिली.
● कायदा काय सांगतो ?
भारतीय दंड विधान 494 नुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करता येत नाही. पती किंवा पत्नी जिवंत असताना ज्याही जोडीदाराने दुसऱ्याशी लग्न केल्यास ते लग्न कायद्याने ग्राह्य धरले जात नाही. असे झाल्यास दुसरे लग्न करणाऱ्या पतीला किंवा पत्नीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते आणि दंड देखील होऊ शकतो.
भारतीय दंड विधान 494 नुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करता येत नाही. मात्र, स्वखुशीने जर दोन्ही पत्नी राहत असतील तर तो गुन्हा ठरत नाही असे असा कायदा सांगतो. भारतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. पण समजा दोन्ही पत्नी स्वखुशीने आणि सहमतीने जर नांदत असतील तर हा गुन्हा ठरत नाही. कारण देशातील अनेक भागात दोन लग्नांची पद्धत दिसून येते. जर त्या मुली एकाच पतीसोबत राहण्यास तयार असतील तर इतर व्यक्ती त्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही असही कायदा सांगतो.