सोलापूर : सोलापूरच्या चिखर्डे येथे दिव्यांगाचा निधी मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात 3 महिन्यांपूर्वी वैष्णवी कुरळेचा मृत्यू झाला होता. तर आता आंदोलनादरम्यान तिचा 10 वर्षाचा भाऊ संभव कुरळेचा मृत्यू झाला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर निधी देण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते. पण त्याची पूर्तता झाली नाही. अधिकाऱ्यांवर कारवाई करा तेव्हाच मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू, अशी भूमिका कुटुंबाने घेतली. Solapur. Disability siblings die in agitation; An attempt was made to set the body on fire by pouring diesel on it
सोलापूर – दिव्यांग निधीसाठी आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या मुलाचा मृत्यू झाला. बार्शीतल्या चिखर्डेतली घटना तीन महिन्यांपूर्वी मुलीचाही मृत्यू झाला होता. चिखर्डेतील कुरुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नशिबी आलेल्या शारीरिक व्यंगत्वानं कठीण झालेल्या जगण्याला दिव्यांग निधीचा काहीसा आधार असतो. मात्र हा निधी मिळवण्यासाठी वैष्णवी आणि संभव या दोघांना आपला जीव द्यावा लागला. यातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
तीन महिन्यांपूर्वी दिव्यांग निधी मिळावा म्हणून बार्शीतल्या चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई – वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या 13 वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे रामचंद्र कुरुळे यांच्या 10 वर्षीय मुलाचा देखील या आंदोलनात मृत्यू झाला. अवघ्या तीन महिन्यात आपल्या दोन्ही मुलं गमावल्याने बार्शीतल्या कुरुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावावर शोककळा पसरली आहे. गावातील रामचंद्र कुरळे यांनी अवघ्या तीन महिन्यात आपली दोन्ही मुलं गमावली आहेत. दिव्यांगासाठी असलेला निधी मिळाला नाही म्हणून रामचंद्र कुरुळे आणि त्यांचे कुटुंबीय ऑगस्ट महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. या आंदोलनात अल्पवयीन मुलगी वैष्णवी हिचा मृत्यू झाला होता. वैष्णवी हिच्या दुर्दैवी निधनानंतर संबंधितांवर कारवाई करू, तसेच निधी देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करून कुरुळे कुटुंबियांनी वैष्णवीच्या पार्थिववर अंत्यसंस्कार केले होते.
तीन महिने उलटून देखील आश्वासनाची पूर्तता न झाल्याने कुरुळे कुटुंबीय पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. गावातील स्मशानभूमीत कुरुळे कुटुंबीय उपोषणाला बसले होते. या उपोषणा दरम्यान रामचंद्र कुरुळे यांचा अवघ्या 10 वर्षाचा मुलगा संभव याचा देखील मृत्यू झाला आहे. खरंतर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तरी प्रशासनाला जाग येणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही आणि दुर्दैवाने दहा वर्षाच्या संभवचा ही उपोषणातच मृत्यू झाला. संभवच्या मृत्यूला 18 तास उलटले तरी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता चिखर्डेतील ग्रामस्थ देखील आक्रमक झाले.
प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दोषींवर कारवाई होतं नाही तो पर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका कुरुळे कुटुंबियांनी घेतली. त्यानंतर तहसीलदार सुनील शेरखाने, प्रांतधिकारी हेमंत निकम पोलिसांसह पोहोचले. गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांना सक्तीच्या रजेवर पाठवत चौकशी करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर । चला उद्या रक्तदान करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करूया !
सोलापूर : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर संचलित रक्तपेढीमार्फत उद्या मंगळवारी ( दि. 6 डिसेंबर) सकाळी सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सोलापुरात डॉ. आंबेडकर चौकात रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक डॉ. औदुंबर मस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“चला रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहूया” या अभियानांतर्गत संपूर्ण जगभरात लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा व दुबई या देशांमध्ये तसेच भारतात काश्मीर कन्याकुमारी केरळ सहित वीस राज्य व महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये महापरिनिर्वाणदिनी एकाच दिवशी रक्तदान करून डॉक्टर आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
जगभरात एकाच दिवशी रक्तदानाचे “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात हे रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापुरात डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागील मैदानावर हे महा शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी एकूण 75 बेडची सोय करण्यात आली असून वीस डॉक्टर्स उपलब्ध राहणार आहेत. नेटके नियोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांना फोटोसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे डॉक्टर औदुंबर मस्के यांनी यावेळी सांगितले.
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” आहे. अपघातानंतर रक्तस्राव झालेले रुग्ण, अनेमिया यासह विविध रुग्णांना या रक्तदानामुळे मोठा लाभ होणार आहे. समाजातील विविध संघटना, पक्ष यांनी वेगवेगळे रक्तदान शिबिर न भरवता या अभियानातअंतर्गत जास्तीत जास्त संख्येने या रक्तदान शिबिरात रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. औदुंबर मस्के यांनी यावेळी केले आहे.
पत्रकार परिषदेस रक्तपेढीचे प्रमुख डॉ. सुशील सोनवणे, प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते.