सांगली : सांगली-मिरज-कुपवाड मनपा क्षेत्रात 4 हजार 213 रुग्णसंख्या झाली आहे. आज मंगळवारच्या अहवालानुसार 19 मृत्यू झाले आहेत तर 311 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज अखेर 3 हजार 806 रुग्ण बरे झाले आहेत. बाधितांच्या संख्यापेक्षा कोरोनामुक्तीचे प्रमाण नगण्य आहे.
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 7 हजार 54 वर पोहोचली आहे. आज अखेर 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज उपचाराखाली 3 हजार 20 रुग्ण आहेत. मंगळवारी 1 हजार 569 rt-pcr टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 210 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. 780 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 104 रुग्ण आढळून आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजची तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी 26,जत 4,कडेगाव 14, कवठेमहांकाळ 8, खानापूर 15, मिरज 27,पलूस 43,शिराळा 25,तासगाव 15,वाळवा 10,सांगली 76, मिरज 48 अशी आहे.
मंगळवारच्या अहवालातील मृतांमध्ये सांगली येथील 55 वर्षांची महिला, 82 वर्षांचा पुरुष, 66, 51 वर्षांचे पुरुष असे आहेत. मिरज येथील 52,70,62 वर्षांचे पुरुष, बागणी येथील 60 वर्षांचा पुरुष, मलगाव येथील 52 वर्षांची महिला, बामणोली येथील 76 वर्षांचा पुरुष, धनगव येथील 58 वर्षांचा पुरुष, तासगाव येथील 71ववर्षांचा पुरुष, मसुचिवाडी येथील 65 वर्षांची महिला, तांदुळवाडी येथील 52 वर्षांचा पुरुष, कुपवाड येथील 65 वर्षांचा पुरुष, इंग्रल येथील 60 वर्षांची महिला, कुंडल 65 वर्षांची महिला, गुडेवाडी येथील 24 वर्षांचा पुरुष असे आहेत.
* तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या
– आटपाडी 285, जत 239, कडेगाव 146, कवठेमहांकाळ 222, खानापूर 129, मिरज 589, पलूस 216, शिराळा 293,तासगाव 215, वाळवा 334, मनपा 4 हजार 92 अशी आहे.