Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट । श्री  वटवृक्ष मंदिर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्रात श्री दत्त जयंती साजरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अक्कलकोट । श्री  वटवृक्ष मंदिर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्रात श्री दत्त जयंती साजरी

Surajya Digital
Last updated: 2022/12/07 at 10:35 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीदत्त जयंती साजरी

अक्कलकोट : अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर आणि  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र  मंडळात आज बुधवारी श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.  Akkalkot. Sri Vatvriksha Mandir, Swami Samarth Annachhatra celebrates Sri Dutt Jayanti

पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकडआरती करण्यात आली. त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते.

 

सकाळी साडेअकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत निघालेले स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोटी विसावली. यामध्ये रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, भांडुप-मुंबई, बार्शी, भातम्बरे, इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता. या दिंडी व पालखीसोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्त निवासात केली होती.

पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत दिवसभरात हजारो स्वामीभक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना रांगेत व टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिराचे कर्मचारी, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.

आज दिवसभरात आमदार सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापूरे, सोलापूरचे धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी, ठाण्याचे असिस्टंट पोलीस कमिशनर धोटे मॅडम, आदींसह विविध मान्यवरांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. आज दिवसभरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त केला होता.

दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्त जन्म आख्यान, वाचन, व दत्तसंप्रदायिक भजन होऊन सायंकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या अधिपत्त्या खाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पाळणा पूजन व चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाला.

या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, विजय दास, प्रदीप झपके, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, मोहन जाधव, जयप्रकाश तोळणूरे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, अमर पाटील, ज्ञानेश्वर भोसले, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, प्रदीप हिंडोळे, महादेव तेली, स्वामीनाथ लोणारी, नरेंद्र शिर्के, सचिन हन्नूरे, संजय पवार, दीपक गवळी, सागर दळवी, शिवाजी यादव, लखन सुरवसे, रमेश होमकर, सचिन पेटकर, श्रीशैल गवंडी, श्रीनिवास इंगळे, मंगेश फुटाणे, चंद्रकांत गवंडी, नरसप्पा मस्कले, रामचंद्र समाणे, मनोज इंगोले आदी उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीदत्त जयंती साजरी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा बुधवारी सायंकाळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

 

श्री दत्तमंदिर नव्याने साकारण्यात आलेले असून या मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजविण्यात आले. यंदा पु.ना.गाडगीळ या सराफ पेढीने तयार केलेल्या लक्षवेधी चांदीच्या पाळण्याला देखील गुलाबाच्या फुलाने सुशोभित करण्यात आले होते.

 

दरम्यान न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आला. दुपारी ४.३० वा. श्री वागदरी महिला भजनी मंडळाचे भजन सायं. ५.५० मि.नामस्मरण, सायं. ६ वा. श्री दत्तजन्म व गुलाल, पाळणा हा कार्यक्रम न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

संकल्प व नैवेद्य आरती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. भजनी मंडळाचा सत्कार न्यासाच्या वतीने झाला. याप्रसंगी सुंठवडा प्रसाद व मसाला दूध वाटप करण्यात आले.

 

न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, कु.तेजस्वी भोसले, गीतांजली अमोल शिंदे, नंदा चव्हाण, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, विशाला अभय दिवाणजी, निंगुताई हिंडोळे, खजिनदार स्मिता कदम, डॉ.असावरी पेडगावकर, कोमल क्षीरसागर, अंजना भोसले, सुवर्णा घाडगे, पल्लवी नवले, क्रांती वाकडे, कविता वाकडे, स्वप्ना माने, वैशाली यादव, रेखा पवार, अंजना भोसले, हर्षदा पवार यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, अरविंद शिंदे, सनी सोनटक्के, रमेश केत, संदीप सुरवसे, वैभव नवले, अभियंता अमित थोरात आदी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पू पुजारी व बाळासाहेब घाडगे यांनी केले.

 

 

 

You Might Also Like

सोलापूर : टुर्स बुकिंगच्या आमिषातून ३१ लाखांची फसवणूक

जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

डॉ. वळसंगकर आत्महत्या : डॉ. शोनाली, डॉ. जोशींच्या सहीचे निवेदन व्हायरल

सोलापूर मनपा, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

यशवंत पंचायत राजमध्ये सोलापूर जिल्हा परिषद तृतीय

TAGGED: #Akkalkot #Sri #VatvrikshaMandir #SwamiSamarth #Annachhatra #celebrates #SriDuttJayanti, #अक्कलकोट #श्रीवटवृक्षमंदिर #स्वामीसमर्थ #अन्नछत्र #श्रीदत्तजयंती #साजरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विमान सेवेसाठी सोलापूर महापालिकेसमोर सोमवारपासून हलगीनाद आंदोलन
Next Article सोलापूर । प्रशासनाने अपात्रतेची दाबताच कळ, कर्नाटकाचा ठराव करणाऱ्या गावांनी काढला पळ

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?