□ स्व. विष्णुपंत कोठे यांच्या तालमीत तयार झालेले चेतन नरोटे
सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचे विश्वासू चेतन नरोटे यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज गुरूवारी मुंबईत देण्यात आले. Chetan Narote as City President of Solapur City Congress, where is Vishnupant Tatya Kothe
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे या उपस्थित होत्या. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मुदत संपल्याने राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांच्या जागेवर नरोटे यांची निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभमीवर हा बदल झाल्याचे मानण्यात येत आहे.
काँग्रेसचे विशेषत: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठांवत म्हणून नरोटे यांची ओळख आहे. काँग्रेस नेते स्व. विष्णुपंत कोठे यांच्या तालमीत तयार झालेले नरोटे यांची कोठे आणि शिंदे घराण्यावर निष्ठा आहे. स्थायी समिती सभापती, पालिकेतील गटनेते अशी अनेक पदे त्यांनी भुषविली आहेत. आक्रमक शैलीने नरोटे यांनी पालिकेच्या सभागृहात विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. नरोटे यांना निष्ठेचे फळ मिळाल्याचे काँग्रेस वर्तुळात बोलले जात आहे.
मुंबईत त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक विनोद भोसले, सुशील बंदपट्टे व कार्यकर्ते उपस्थित होते. जुन्या – नव्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखविण्याची जबाबदारी नुतन शहराध्यक्ष नरोटे यांच्यावर असणार आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध असून त्याचा कितपत फायदा पक्षाला होईल हे आगामी काळच ठरवेल असेही बोलले जात आहे.
शहर काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग पाच टर्म नगरसेवक राहिलेले चेतन नरोटे यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली आहे. आज गुरुवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे. आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची मुदत संपली आहे. त्यामुळे शहर कार्यकारणीमध्ये बदल करण्याचे संकेत प्रदेश पातळीवरून देण्यात आले होते. आगामी पालिका निवडणुका आणि खा. राहुल गांधीनी तरुणांना संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार सोलापुरात काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी आणण्यासाठी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी चेतन नरोटे यांच्या खांद्यावर दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
चेतन नरोटे हे धनगर समाजाचे मोठे नेते आहेत. सलग पाच टर्म नगरसेवक राहिले आहेत. काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. स्व. तात्या कोठे यांच्या कुशीत तयार झालेले नरोटे यांची कोठे आणि शिंदे घराण्यावर निष्ठा आहे. स्थायी समिती सभापती, पालिकेतील गटनेते, अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. आपल्या आक्रमक शैलीने नरोटे यांनी पालिकेच्या सभागृहात विविध प्रश्नावर आवाज उठवला आहे. नरोटे हे सध्या सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे यांच्या जवळ आहेत. निष्ठेचे फळ नरोटे यांना मिळाले आहे. आज मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित निवडीचे पत्र दिले गेले.
या बदलाच्या हालचाली कालपासूनच सुरू झाल्यानंतर कालच प्रतिक्रिया देण्यात आल्या. पक्षाच्या पडत्या काळात सुशीलकुमार शिंदे यांनी माझी शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. पक्ष अडचणीत असल्याने इतर कोणीही पद स्वीकारायला तयार नाही, असे शिंदे यांनी सांगितले होते. या काळात मी काम केले आणि शिंदे यांनी सांगताच पदही सोडून दिल्याचे मावळते अध्यक्ष प्रकाश वाले यांनी सांगितले.
पक्षात यापूर्वीही माझ्या नावाची चर्चा झाली. शिंदे कुटुंबीय आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आजवर मला दोन वेळा काँग्रेस सोडण्याची ऑफर देण्यात आली होती; पण मी काँग्रेस सोडली नाही. ही निष्ठाच आज कामाला आली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून गुरुवारी पत्र स्वीकारणार असल्याचे चेतन नरोटे यांनी सांगितले होते.