सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी आणखी 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 622 वर पोहोचला आहे. मंगळवारी आणखी 357 कोरोनाबाधितांची भर पडली आहे.त्यामुळे सेालापूर जिल्ह्यात जवळपास 14 हजार 186 जण कोरोनाबाधित झाले आहेत.
काल मंगळवारअखेर सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 15 हजार 624 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 15 हजार 487 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. 1 लाख 1 हजार 302 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
14 हजार 186 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखी 137 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील 3 हजार 964 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 9 हजार 600 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 622 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत चालला असून मंगळवारी जिल्ह्यातील 1798 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1554 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 244 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आणखी 137 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर शहरात मंगळवारी 2 हजार 19 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1986 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 113 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात मंगळवारी एकाही रुग्णाचा अहवाल प्रलंबित नव्हता. रॅपिड टेस्टमुळे तपासणीची संख्या वाढली असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.