मुंबई : टी-20 मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सुपर ओव्हरमध्ये थरारक असा विजय मिळवला. यात महाराष्ट्राची लेक स्मृती मंधाना हिने रेकॉर्ड करत महिला क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक अर्धशतक करणारी क्रिकेटपटू ठरली आहे. स्मृतीचे टी-20 क्रिकेटमधील हे 12 वे अर्धशतक ठरले. Maharashtra’s Lekki’s world record: Smriti Mandhana made history
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 11 अर्धशतकं ठोकली आहेत. महिलांच्या क्रिकेटमध्ये स्मृतीने वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरला मागे टाकले आहे. स्मृतीचे T20 क्रिकेटमधील हे 12 वे अर्धशतक ठरले. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारी ती क्रिकेटपटू ठरली आहे. विराटला ‘चेस किंग’ म्हणजेच आव्हानाचा पाठलाग करण्यात तरबेज असं म्हटलं जाते. स्मृती मंधाना या बाबतीत महिला क्रिकेटमधील निष्णात खेळाडू असल्याने आता ती महिला क्रिकेटची ‘क्वीन’ झाली असल्याचे सिद्ध होत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना डीव्हाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवायचा होता. या सामन्याची हीरो सलामीवीर स्मृती मंधाना ठरली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500हून अधिक धावा करणारी स्मृती मंधाना ही दुसरी महिला खेळाडू ठरली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात स्मृती मंधानाची जोरदार खेळी झाली. संघासाठी डावाची सुरुवात करताना तिने 49 चेंडूत 161.22च्या स्ट्राईक रेटने 79 धावांची खेळी केली. यादरम्यान तिच्या बॅटमधून 9 चौकार आणि 9 षटकार निघाले.
#TeamIndia set a target of 2⃣1⃣ for Australia in the super over!
Over to our bowlers 💪
Follow the match 👉 https://t.co/2OlSECwnGk…#INDvAUS pic.twitter.com/51O75fWxJO
— BCCI Women (@BCCIWomen) December 11, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारताने 20 षट्कात ऑस्ट्रेलियाच्या इतकेच म्हणजे 187 धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी 5 धावांची गरज असताना ऋचा घोषने चौकार मारला आणि धावसंख्या समान झाले.
१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मंधानाने ४९ चेंडूत ७९ धावा फटकावल्या. तिने आपली खेळी ४ षटकार आणि ९ चौकारांनी सजवली. मंधानाने १६०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या धुवांधार खेळीदरम्यान स्मृतीने एक महत्त्वपूर्ण विक्रम केला. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये किंग कोहलीच्या नावावर हा विक्रम आहे. त्यामुळे आता महिलांच्या क्रिकेटमध्ये स्मृती हळूहळू ‘क्वीन’ होत असल्याची चाहत्यांची भावना आहे.
स्मृतीने T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठलाग करताना १२ वे अर्धशतक झळकावले. महिला क्रिकेटमधील हा विश्वविक्रम आहे. मंधानाने वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरला मागे टाकले. तिच्या नावावर ११ अर्धशतके आहेत. स्मृती मंधानाला लक्ष्याचा पाठलाग करायला आवडते आणि तिने पाठलाग करताना ४५ डावांत १,२९१ धावा केल्या आहेत. या दरम्यान, तिची सरासरी ३५.८६ आहे. ही तिच्या कारकिर्दीच्या सरासरीपेक्षा जवळपास ८ धावांनी अधिक आहे. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाठलाग करताना तिने २० अर्धशतके झळकावली आहेत. तसेच तिने ४५ डावांत ७३.४४ च्या सरासरीने १,९८३ धावा केल्या आहेत.