कॅलिफोर्निया : भारताच्या स्वातंत्र्य झाल्याचं औचित्य साधत कॅलिफोर्नियाने एक स्युत्य काम केलंय. 15 ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने सर्वांच्या मनात घर करून बसलेल्या सुशांत सिंग राजपूतला मरणोत्तर पुरस्कार दिला आहे. सुशांतची बहिण श्वेताने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्ती हिने हा पुरस्कार स्विकारला आहे. सुशांतने अनेक सामाजिक कार्यांमध्ये वाटा उचलला होता. त्याच्या या कार्याचं कौतुक म्हणून त्याचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
श्वेता तिच्या ट्विटमध्ये म्हणते, ‘स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियाने माझ्या भावाचा म्हणजेच सुशांत सिंग राजपूतचा सन्मान केला आहे. कॅलिफोर्निया आमच्या सोबत आहे…तुम्ही आहात का? कॅलिफोर्नियाने आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.’ सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने स्वातंत्रदिनाच्या दिवशी एकत्र येण्याचे आणि सामुहिक स्वरुपात दिवंगत अभिनेत्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
सुशांतच्या बहिणीसह त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. 14 जून रोजी सुशांत सिंगने आत्महत्या केली. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनीही अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान सध्या मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि ईडीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.