□ बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000 डॉलर महिला टेनिस स्पर्धा
□ अनास्तासिया कुलिकोवा, प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो यांचा अंतिम फेरीत प्रवेश
सोलापूर : सोलापुरात आयोजित बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000 डॉलर महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे जोडीला दुहेरीचे विजेतेपद मिळाले आहे. अनास्तासिया कुलिकोवा, प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो यांचा अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. Solapur. India’s Ankita Raina, Prathanna Thombre win doubles title Balaji Amines Solapur Open $25000 Women’s Tennis Tournament
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओॲसिस, प्रिसीजन, जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000 डॉलर महिला टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे या अव्वल मानांकीत जोडीने केवळ 55 मिनिटाच्या लढतीत इंडोनेशियाच्या प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो व रशियाच्या एकटेरिना याशिना या दुस-या मानांकीत जोडीचा 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत फिनलँडच्या तिस-या मानांकीत अनास्तासिया कुलिकोवा हिने भारताच्या अव्वल मानांकीत अंकिता रैनाचा 5-7, 7-5, 6-3 असा तर इंडोनेशियाच्या आठव्या मानांकीत प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहोने रशियाच्या डारिया कुडाशोवाचा 1-6, 6-4, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर जिल्ह्यात गोवरचे लसीकरण सुरू, सहा रूग्ण आढळले
सोलापूर : राज्यभरात गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून गोवर लसीकरणास मोहिमेस गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.
शेती, वीटभट्टी, साखर कारखाने आदी. परिसरात जाऊन आरोग्य विभागाकडून लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात नियमित लसीकरण अंतर्गत बालकांना वयाच्या ९ ते १२ महिन्यांत गोवर रुबेला लसीचा पहिला डोस देण्यात येतो. तसेच १६ ते २४ महिने वयाच्या कालावधीत दुसरा डोस दिला जातो. जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ग्रामीण भागात १ तर शहरात पाच गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत.
नियमित लसीकरणाच्या अहवालानुसार जिल्ह्यात गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसऱ्या डोसचे काम हे ९५ टक्के इतके झाले आहे.’ सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार लसीकरण लाभार्थी न झालेल्या मुलांची यादी तयार करण्यात आली आहे.
सर्व मुलांना लस दिल्याची खात्री वैद्यकीय अधिकारी, समुदाय अधिकारी हे करणार आहेत. तर थेट शेती, वाड्या वस्त्यावर जाऊन अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी हे लसीकरण करणार आहेत.