सोलापूर : वीस वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगून जेल मधून सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा दागिने चोरी केल्याने पोलिसांनी त्या आरोपीला पकडून त्याच्याकडून चार लाख पन्नास हजारांचे चोरीचे दागिने जप्त केले आहे. Stolen jewels recovered from life -sentenced criminal; The worker of Kumar Karjagi’s house turned out to be a thief in Solapur
रवीकुमार उर्फ रमेशकुमार अँब्लेसप्पा कुरबा (वय-४८,रा. एमपीएसएल कॉलनी, अशापुर रोड, राजमाता मंदिर, रायचूर, राज्य- कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. कुमार शंकर करजगी यांच्या घरी दि. २९ नोव्हेंबर रोजी बेडरूममधील शोकेसवर ठेवलेले नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी कुमार करजगी यांनी त्यांच्या घरी कामास ठेवलेला इसम रवीकुमार उर्फ रमेशकुमार अँब्लेसप्पा कुरबा याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
चोरी झालेल्या दिवशी कुरबा याचा शोध घेतला,परंतु तो मिळून आला नाही. त्यानंतर रवीकुमार याला मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला असता त्यावेळी देखील संपर्क झाला नाही. दरम्यान पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपी रवीकुमार उर्फ रमेशकुमार अँब्लेसप्पा कुरबा हा भैय्या चौक रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकातील पोह. श्रीकांत पवार, विजयकुमार वाळके, राहुल तोघे, गणेश शिंदे यांनी सापळा लावून रविकुमार याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविकुमार यांच्याकडे तपास केला. त्याने चोरी केलेले चार तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या व पाच तोळे वजनाचे लिंग असा एकूण ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेल्या लॉजमध्ये ठेवल्याचे कबूल केले. तपास पथकाने ते दागिने जप्त केले.
● कुमार करजगींच्या घरातील कामगारच निघाला चोर
वीस वर्षाची जन्मठेपेची शिक्षा भोगून सुटल्यानंतर रवीकुमार याच्याकडे आधार कार्ड नसल्याने त्याला कोणी कामावर ठेवून घेत नव्हते. मात्र माणुसकीच्या नात्याने कुमार करजगी यांनी रविकुमार याला माळी कामासाठी महिनाभरापूर्वी कामावर ठेवले होते. परंतु माळी कामासाठी ज्या कामगाराला काम दिले, तोच कामगार चोर निघाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 बालिकेचा विनयभंग करणार्या तरूणास 3 महिने कैदेची शिक्षा
सोलापूर – दहा वर्षाच्या बालिकेचा विनयभंग करणार्या तरूणास पॉक्सोचे विशेष न्यायाधीश व्हि. पी. आव्हाड यांनी 3 महिने कैदेची शिक्षा सुनावली.
श्रीधर सुभाष गंधमल (वय 34, रा. विजापूर रोड, सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पिडीतेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
13 जानेवारी 2021 रोजी यातील दहा वर्षाची बालिका ही विजापूर रोडवरील वन विभागाच्या स्मृती उद्यान परिसरातून जात होती. त्यावेळी त्याठिकाणी थांबलेल्या श्रीधर गंधमल याने त्या बालिकेचा विनयभंग केला होता. म्हणून पिडीत बालिकेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक सविता पाटील यांनी करून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले. या खटल्याची सुनावणी पॉक्सोचे विशेष न्यायाधीश आव्हाड यांच्यासमोर झाली.
सरकारच्यावतीने याप्रकरणी 7 साक्षीदार तपासण्यात आली. पिडीत बालिका, साक्षीदार व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश आव्हाड यांनी आरोपी गंधमल यास 3 महिने कैदेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारच्यावतीने अॅड. शीतल डोके यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड. महेश जगताप यांनी काम पाहिले.