Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मयत शिक्षकाच्या पत्नीची जिल्हा परिषदेकडून होतेय उपेक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मयत शिक्षकाच्या पत्नीची जिल्हा परिषदेकडून होतेय उपेक्षा

Surajya Digital
Last updated: 2022/12/20 at 4:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ न्याय न मिळाल्यास पतीच्या अस्थी घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● ११ महिन्यांपासून झेडपीकडे हेलपाटे – सुप्रिया हरी काळे, विधवापत्नी

□ न्याय न मिळाल्यास पतीच्या अस्थी घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा

सोलापूर : करमाळ्यातील मयत शिक्षकाच्या पत्नीची देय रकमा देण्यावरून जिल्हा परिषदेकडून उपेक्षा होत आहे. न्याय न मिळाल्यास पतीच्या अस्थी घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी माध्यमाद्वारे प्रशासनाला दिला आहे. The Zilla Parishad is neglecting the deceased teacher’s wife to pay the amount due to Solapur Karmala

 

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेल्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील शिक्षक हरी गोपीनाथ काळे यांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यांच्या पत्नीला गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देय रकमा मिळाल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या पत्नीला चक्क घरामध्येच अस्थी ठेवून जिल्हा परिषदेकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेकडून न्याय नाही मिळाल्यास झेडपीसमोर पतीच्या अस्थिंसह आंदोलन करणार असल्याचा इशारा सुप्रिया काळे यांनी दिला आहे.

 

हरी काळे यांचा मृत्यू २५ मार्च २०२२ रोजी किडनी विकारामुळे झाला होता. काळे हे वाघमोडे वस्ती वाशिंबे येथे गेली १४ वर्षे पाच महिने कार्यरत होते. त्यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित देखील करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला अस्थि विसर्जनासाठी देखील पैसे नाहीत. अशी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

त्यामुळे दोन महिने थकीत रकमा, मेडिकल बिल, डीसीपीएस रक्कम, अनुकंपाखालील नियुक्ती करावी, चटोपाध्याय वेतनश्रेणी अशी मागणी सुप्रिया हरी काळे यांनी केली आहे. त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या रकमा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेसमोर त्यांच्या अस्थी घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांच्या पत्नी सुप्रिया हरी काळे यांनी दिला आहे.

घरातील कर्ता पुरुष गेल्याने घर चालविले अवघड झाले आहे. घरातील सासरा, दीर यांचाही मृत्यू झाला असून, घरात कुणीच कर्ता माणूस नाही. त्यामुळे पतीची देयक रकमा मिळावी, यासाठी गेल्या अकरा महिन्यांपासून जिल्हा परिषदेकडे त्या हेलपाटे मारत आहेत. मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रत्येकवेळी टाळाटाळ करीत असल्याची माहिती सुप्रिया काळे यांनी सांगितली.

 

● ११ महिन्यांपासून झेडपीकडे हेलपाटे

जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून पतीच्या देय रकमा मिळाव्यात, यासाठी चकरा मारीत आहे. परंतु शिक्षणाधिकारी माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करत आहेत. गेल्या अकरा महिन्यांपासून आठवड्यातून दोनवेळा जिल्हा परिषदेत येत आहे. प्रत्येक वेळी विविध कारणांमुळे अधिकाऱ्यांची भेट होत नाही आणि झाली तर मॅडम तुमचे काम होईल जावा, असे सांगण्यात येत आहे.

– सुप्रिया हरी काळे, विधवापत्नी

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #ZillaParishad #neglecting #deceased #teacher's #wife #pay #amount #Solapur #Karmala, #मयत #शिक्षक #पत्नी #करमाळा #सोलापूर #जिल्हापरिषद #उपेक्षा #देयरकमा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हे बरोबर नाही…. देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले; उत्तर देण्यासाठी बोलताना सभागृह तहकूब
Next Article माढा । भोसरे ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर, आमदार शिंदे बंधूंचे एकहाती वर्चस्व

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?