वर्धा : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्वीट केलं आहे. त्यांनी या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याविषयी प्रश्न केला असता त्यांनी, “पार्थ पवार यांनी काय ट्वीट केले, ते मला माहित नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण त्यांनी जी सीबीआयची मागणी केली होती हे खरंच आहे. त्यांची मागणी आजोबांना आवडली, की नाही आवडली, यावर मला कमेंट करायची नाही. पण त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे ग्राह्य धरली आहे. म्हणून कदाचित त्यांनी ते ट्वीट केलं असावं” असं फडणवीस म्हणाले.
* महाराष्ट्र सरकारला दणका
पार्थ पवार यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह भाजपाचे खासदार व नेते सुब्रमण्यम स्वामी, अनेक भाजपा नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर, सुप्रीम कोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला.आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआय कडे सोपवण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई पोलिसांनी देखील अनेक बड्या दिग्दर्शकांसह बॉलिवूड कलाकारांची चौकशी केली असून महत्वाचे धागेदोरे अजूनही हाती लागलेले नाहीत.