सोलापूर : पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. Police sub-inspector working in Pandharpur dies of heart attack Mohol Solapur
सोलापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. युवराज कृष्णा भालेराव (वय 56) असे मयत उपनिरीक्षकाचे नाव आहे. भालेराव हे पंढरपुरातील विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सुट्टीनिमित्त मामाच्या गावी मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे गेले असता तेथेच त्यांचे निधन झाले.
युवराज भालेराव यांची नुकतीच खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांच्या निधनाने सोलापूर सह राज्य पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. हा प्रकार शुक्रवार (ता २३ डिसेंबर) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास झाला.
पंढरपूर येथील संत निरंकाही मठ, सांगोला रोड येथे भालेराव हे राहावयास होते. मोहोळ येथे दोन दिवसाच्या सुट्टीनिमित्त मामाच्या गावी गेले होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची खबर चेतन भालेराव यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुसळे हे करीत आहेत. भालेराव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन विवाहित मुले असा परिवार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ कुर्डूवाडीत रविवारी सुषमा अंधारे यांची तोफ कोणावर धडाडणार
कुर्डुवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कुर्डूवाडी शहरातील गांधी चौकामध्ये रविवारी ( दि.२५ ) सायंकाळी ६ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.
सुषमा अंधारे सभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर तोफ धडाडणार का? याचबरोबर कोणाकोणाच्या विषयांवर बोलणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सभेमुळे शहरातील शिवसैनिक व महिला पदाधिकाऱ्यांना बळ मिळणार का? याची चर्चा होत आहे.
कुर्डूवाडी शहरातील नगरपरिषदेची सत्ता गेल्या पंचवीस वर्षापासून उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकत आहे. दर निवडणुकीमध्ये आघाडी, महाविकास आघाडी, भीमशक्ती शिवशक्ती अशा प्रकारे विविध आघाड्यां करून निवडणुकीचे समीकरण घालून कुर्डूवाडी नगरपालिकेवर सत्ता कायम ठेवत यश मिळवले आहे. तर या दरम्यान इतर कोणताही राजकीय पक्ष मोठा झाला नाही. तर सक्षम नसल्याचे सध्या चित्र दिसत आहे.
माढा तालुक्यातील वाकाव गावचे सुपुत्र शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत व त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांचा कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अप्रत्यक्ष विरोध दर्शवला जात असे तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तानाजी सावंत यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार निवडून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे व तानाजी सावंत मध्ये दुरावा निर्माण झाला होता. यानंतर मुख्यमंत्री शिंदे गट स्वतंत्र गट निर्माण झाल्यानंतर तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्री पद मिळाले.
शिवसेनेच्या उपनेते सुषमा आंधारे यांच्या राज्यभरात सभाचा धडाका सुरू असून मुख्यमंत्री शिंदे गट, भाजप व मनसेवर त्या जोरदार टीका करीत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या धडाकेबाज भाषणांमुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे व त्यांना गावागावात ओळखू लागले आहेत. याच सुषमा अंधारे यांचा सोलापूर जिल्हा ही आयोजित करण्यात आला आहे.
कुर्डूवाडी शहरातील गांधी चौकात दि.२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सुषमा आंधारे यांची कोणावर तोफ डागणार व कोणाबद्दल काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.