नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोफत रेशन योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांना खाण्यासाठी मदत म्हणून एप्रिल 2020 मध्ये PMGKAY लाँच करण्यात आली. केंद्रीय मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय झाला आहे. 80 crore people will get free ration; Extension of Pradhan Mantri Garib Kalyan Yojana for 1 year
या योजनेअंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत दिले जाते. याचसोबत वन रँक वन पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी 20600 पेन्शनधारकांना लाभ मिळत होता. आता सुधारणा केल्यानंतर 25 लाख पेन्शनधारक झाले आहेत.
देशातील सर्वसामान्य जनतेला मोफत धान्य देण्याबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. बैठकीची माहिती केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन अतिरिक्त बोजा पडणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गरिबांना रेशनसाठी एक रुपयाही वाढवली असल्याचे माहिती केंद्रीयमंत्री द्यावा लागणार नाही. या योजनेवर सरकार दरवर्षी २ लाख कोटी रुपये खर्च करत आहे. यापूर्वी केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांनी
सप्टेंबरमध्ये या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तीन महिन्यांसाठी वाढवली असल्याचे माहिती केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
कोरोना काळात लोकांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. गेल्या १२८ महिन्यांत सरकारने गरिबांना मोफत रेशनवर १.८० लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. कोविड संकटाच्या काळात मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती ४ किलो गहू आणि १ किलो तांदूळ मोफत दिला जातो. गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेला मुदतवाढ दिली जात आहे.
□ पंतप्रधान मोदींनी पुन्हा लावले मास्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मास्क लावून आले होते. केंद्र सरकार कोरोनाबाबत सतर्क झाले असल्याचे दिसून येत आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड व लोकसभा अध्यक्षदेखील आज संसदेत मास्क परिधान करून आले होते. काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी देखील मास्क काढलेला नाही. केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे.
¤ लवकर बूस्टर डोस घ्या – IMA
देशातील दिग्गज डॉक्टरांची संस्था समजल्या जाणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर बूस्टर डोस घ्यावा. गर्दीची ठिकाणे, लग्न समारंभ, राजकीय तसेच सामाजिक सभा व आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, कफ व जुलाब अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी केले आहे.