Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ट्वीट करत दिली आमदार गोरेंच्या तब्येतीची माहिती, पण वडिलांना घातपातचा संशय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

ट्वीट करत दिली आमदार गोरेंच्या तब्येतीची माहिती, पण वडिलांना घातपातचा संशय

Surajya Digital
Last updated: 2022/12/24 at 10:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सातारा : साताऱ्याच्या फलटणमध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. आता गोरेंच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर त्यांच्या तब्येतीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा अपघात काल शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास झाला. Satara tweeted about the health of MLA Jayakumar Gore, but his father suspected an accident

आमदार जयकुमार गोरेंची प्रकृती एकदम चांगली आहे. गाडीतील इतर लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती बरी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल येथे उपचार सुरू आहेत. जयकुमार गोरे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आहेत. साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली असावी अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

pic.twitter.com/nuvLrq8GUL

— Jaykumar Gore (@Jaykumar_Gore) December 24, 2022

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

फलटणच्या मलठणमध्ये भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यात गोरेंना किरकोळ जखम झाली आहे. तर यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. पुलावरून गाडी 30 फुट खोल खड्ड्यात पडली आहे. तसेच अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही. दरम्यान, गोरे हे माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी हॉल हॉस्पिटल येथे भेट देऊन आमदार गोरे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली.

जयकुमार गोरे यांच्या अपघाताविषयी त्यांचे वडील भगवान गोरे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी या अपघातामागे काहीतरी घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. भगवान गोरे म्हणाले, मी आमदारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. मात्र, एक शंका मनात उत्पन्न होत आहे. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो? आमच्या गावात म्हणजे फलटणमध्येच हा अपघात घडला आहे. यामुळे जास्तच शंका येत आहे. त्यांच्या या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

आमदार गोरे मुंबईहून आपल्या घरी साताऱ्याला निघाले होते. त्यावेळी फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्यासमवेत गाडीत असलेले इतर तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदारांसह इतर तिघांवरही पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार,  जयकुमार गोरे आणि इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Satara #tweeted #health #MLA #JayakumarGore #father #suspected #accident, #ट्वीट #सातारा #आमदार #जयकुमारगोरे #तब्येत #माहिती #वडिल #घातपात #संशय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 80 कोटी लोकांना मिळणार मोफत रेशन; ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’ योजनेला 1 वर्षासाठी मुदतवाढ
Next Article तहसीलदारांना मागितली खंडणी; ‘प्रहार’च्या तालुकाध्यक्षाला अटक, शहराध्यक्षावर गुन्हा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?