Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विधानसभेत कर्नाटक विरोधात ठराव मंजूर; सीमाभागातील लोकांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

विधानसभेत कर्नाटक विरोधात ठराव मंजूर; सीमाभागातील लोकांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Surajya Digital
Last updated: 2022/12/27 at 3:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ बाळासाहेबांचा फोटो विधानभवनात लागणार

नागपूर : नागपुरातील अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नाबाबत विधिमंडळात ठराव मांडला आहे. हा ठराव एकमताने मंजूर झाला आहे.  Assembly passes resolution against Karnataka; Eknath Shinde’s big announcement for border people कर्नाटकातील 865 गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल, असे यात सांगण्यात आले. तसेच कर्नाटकच्या वर्तनाचा निषेध करण्यात आला आहे.

 

हिवाळी अधिवेशनात आज कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर सीमाभागातील लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या. 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्यास असल्यास सरकारी नोकरीची संधी देणार, असे शिंदेंनी सांगितले. तसेच सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा शिंदेंनी केली. बेळगाव निपाणीसह 865 गावं महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

 

हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक विरोधातील ठराव मांडला. यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. कर्नाटक सीमाप्रश्नावर ठरावाचं वाचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरु आहे. यावेळी शिंदे यांनी खटला लढण्यासाठी कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली. तसेच कर्नाटक सरकारच्या वर्तनाचा निषेध. महाराष्ट्रातली वाहनांवर हल्ले झाले. सीमेवरची ८६५ गावं महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

राज्यातील वाहनांवर हल्ले झाले. सीमावादावा चीथावणी देण्याच जाणीवपूर्वीक काम कर्नााटक सरकारने केलं. सीमाभागातील मराठी माणसांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू. सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला अर्थिक मदतीची घोषणा यावेळी करण्यात आली. कुटुंबाला दरमहा २० हजाराची मदत जाहिर केली. तसेच सांस्कृतीक शैक्षणिक मदत जाहिर करण्यात आली. यासोबत सीमावरती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखून ठेवणार, असे नमूद आहे.

 

□ बाळासाहेबांचा फोटो विधानभवनात लागणार

 

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो विधानभवनात लावण्यात येणार आहे. विधानभवनाच्या मध्यभागी हे तैलचित्र लावण्यात येणार आहे. हे तैलचित्र लावण्यासंबंधी विधानसभेत सरकारकडून प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. हे तैलचित्र लावून शिंदे गटाने ठाकरे गटावर एकप्रकारे कुरघोडी केली आहे. याआधीच्या सरकारने गेल्या दोन वर्षात हे काम केले नाही, असे शिंदे गटाने म्हटले आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Assembly #passes #resolution #Karnataka #EknathShinde #announcement #border #people, #विधानसभा #कर्नाटकविरोधात #ठराव #मंजूर #सीमाभाग #लोकांसाठी #एकनाथशिंदे #मोठीघोषणा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । कंटेनरच्या धडकेत माथाडी कामगार जागीच ठार, तीन जखमी
Next Article मोहोळ : सुषमा अंधारेंनी महागाई आणि बेरोजगारीवर केला प्रहार, शिंदेभाऊंचासुद्धा देवेंद्रभाऊ गेम करणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?