Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘राज ठाकरेंना जीवे मारण्याचा रचला होता कट’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘राज ठाकरेंना जीवे मारण्याचा रचला होता कट’

Surajya Digital
Last updated: 2022/12/28 at 4:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)■ राज्यातील 1308 रुग्णालयाची मॉक ड्रील पूर्ण □ बाळासाहेबांचा फोटो विधानभवनात लागणार

□ बृजभूषण सिंग यांना राज ठाकरेंविरोधात उचकवत होत्या

मुंबई : अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट रचला होता असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. ‘There was a conspiracy to kill Raj Thackeray’ Brijbhushan Singh Deepali Syed Bhosle खुद्द दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदेंनी हा आरोप केला आहे. तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत दिपाली यांचे कनेक्शन असल्याचाही त्यांनी आरोप केला. दरम्यान, यासाठी त्यांना मोठी रक्कम मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वी त्यांच्या माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदेंने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. शिंदेंनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.

 

दीपाली भोसले – सय्यद चॅरिटेबल ट्रस्टमधून होणारे सर्व व्यवहार बेकायदेशीर आहे. तसेच यासाठी येणारा पैसा हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहाकाऱ्यांद्वारे पुरवला जातो, असा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते काही पुरस्कार दिले होते. यावेळी ५० लोकांना ५० हजारांचे चेक देण्यात आले होते. ते सर्व चेक बनावट होते. सय्यद यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सातशे ते आठशे कोटींचा व्यवहार झाला आहे. हा सर्व पैसा आला कुठून? असाही प्रश्न सवाल उपस्थित केला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

या पैशांची चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे दीपाली सय्यद यांच्याविरोधातले पुरावे सुद्धा आहे. राज्य सरकारने आपल्याला संरक्षण दिल्यास दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत संबंध असल्याचे सर्व पुरावे आपण शासनाला देऊ शकतो, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट रचला होता. त्यासाठी दीपाली सय्यद यांनी भाजप खासदार बृजभूषण सिंग यांची भेट घेतली होती. अयोध्या दौऱ्यात दीपाली सय्यद या बृजभूषण सिंग यांना राज ठाकरेंविरोधात उचकवत होत्या, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

 

■ राज्यातील 1308 रुग्णालयाची मॉक ड्रील पूर्ण

 

राज्यात मॉक ड्रिलच्या माध्यमातून रुग्णालयाची तयारी किती, तिथे व्हेंटिलेटर किती, सुरू किती, इतर संसाधने किती प्रमाणात आहेत याची माहिती घेण्यात आली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. राज्यातील 1308 रुग्णालयाची मॉक ड्रील पूर्ण झाली. आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून ही मॉक ड्रील सुरू आहे. तसेच नवीन वर्ष, यात्रोत्सव हे गर्दीचे दिवस असल्याने काळजी घ्या, असे ते म्हणाले.

□ बाळासाहेबांचा फोटो विधानभवनात लागणार

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो विधानभवनात लावण्यात येणार आहे. विधानभवनाच्या मध्यभागी हे तैलचित्र लावण्यात येणार आहे. हे तैलचित्र लावण्यासंबंधी विधानसभेत सरकारकडून प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. हे तैलचित्र लावून शिंदे गटाने ठाकरे गटावर एकप्रकारे कुरघोडी केली आहे. याआधीच्या सरकारने गेल्या दोन वर्षात हे काम केले नाही, असे शिंदे गटाने म्हटले आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #conspiracy #kill #RajThackeray #BrijbhushanSingh #DeepaliSSyedBhosle, #राजठाकरे #जीवे #मारण्याचा #रचला #कट #दीपालीभोसलेसय्यद #बृजभूषणसिंग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळ : सुषमा अंधारेंनी महागाई आणि बेरोजगारीवर केला प्रहार, शिंदेभाऊंचासुद्धा देवेंद्रभाऊ गेम करणार
Next Article एक वर्ष एक महिना 27 दिवसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आले तुरुंगाबाहेर

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?