सोलापूर – एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडानगर आणि शिवलिंग नगर अशा दोन ठिकाणी दोघा विवाहित इसमांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी बुधवारी पोलीसात झाल्या आहेत. शिगडगावात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. Solapur. Two married persons and one minor girl committed suicide by hanging in Shingdgaon
त्यापैकी पहिली घटना अक्कलकोट रोडवरील कोंडा नगरात घडली. रुपेश रामचंद्र क्षिरसागर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. आज बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत रुपेश क्षीरसागर हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. तो लुम कामगार होता. अशी नोंद पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही. हवालदार कांबळे पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दुसरी घटना एमआयडीसी परिसरातील शिवलिंग नगर येथे बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. रोहन संजय मळसने (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याची पत्नी प्रसुतीसाठी माहेरी गेली आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्याची आई यांनी त्याच्या दोन मुलांना घेऊन बाजूच्या खोलीत घास भरवत होत्या.त्यावेळी त्याने आतल्या खोलीत छताच्या लाकडी वाशाला साडीने गळफास घेतला.आई (रेखा) यांनी फासातून सोडवून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला. मयत रोहन याच्या पश्चात आई – वडील,पत्नी,२ मुले आणि १ मुलगी असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे मात्र समजले नाही पुढील तपास हवालदार पवार करीत आहेत.
□ शिंगडगाव येथे अल्पवयीन तरुणीची विहिरीत आत्महत्या
सोलापूर – शिंगडगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीने विहिरीत आत्महत्या केली. ही घटना आज बुधवारी दुपारी उघडकीस आली.
अंकिता संजय हळळे (वय १५ रा. शिंगडगाव ता.दक्षिण सोलापूर) असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. आज दुपारी तिचा मृतदेह गावातील रामचंद्र कोथिंबिरे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला.
काल मंगळवारी सकाळच्या सुमारास अंकिता ही शौचास जाते म्हणून गेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह आज दुपारी विहीरीत आढळून आला. अंकिता ही दहावी इयत्तेत शिकत होती. तिच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. तिचे वडील शेती व्यवसाय करतात. या घटनेची नोंद वळसंग पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार निंबाळे पुढील तपास करीत आहेत.