Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आंतरजिल्हा एसटी प्रवासाला दिली मंजुरी; महामंडळाच्या मोकळ्या जागेवर इंधनपंप चालू होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आंतरजिल्हा एसटी प्रवासाला दिली मंजुरी; महामंडळाच्या मोकळ्या जागेवर इंधनपंप चालू होणार

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 5:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील आंतर जिल्हा एसटी प्रवास बंद करण्यात आला होता. यामुळे राज्यातील नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होत नव्हती. आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

अनेक दिवसांपासून एसटी सुरू करण्याबाबत नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी प्रवासाला मंजूरी देण्यात आली आहे. अर्थातच या प्रवासासोबत अनेक अटी शर्थी लागू असणार आहे. परंतु खासगी वाहनांसाठी ई-पास गरजेचा असणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अनलॉकचे नियम हळूहळू शिथिल होत असताना राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी फक्त एसटी बससाठी असणार आहे. जिल्ह्याबाहेर एसटी बस सेवा सुरू होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एस बस सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ईपासही गरज नसेल. मात्र खासगी चारचाकी वाहनांसाठी मात्र ईपास आवश्यक असणार आहे.

* महामंडळाच्या मोकळ्या जागेवर इंधनपंप चालू होणार

लॉकडाऊन काळात बस सेवा बंद राहिल्याने एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.

सह्याद्री येथे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर 30 ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि 5 ठिकाणी एल.एन.जी.पंप सुरु करण्यात येणार आहे. सदर पेट्रोल-डिझेलपंप/ एल.एन.जी.पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #अनिलपरब #मोकळ्याजागेवर #महामंडाळाच्या #इंधनपंप #आंतरजिल्हा #बसचालू #मंजुरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चार वर्षापासून निकालाची प्रतीक्षा करणा-या मंगळवेढेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हाती मिळणार निकाल
Next Article सुशांतप्रकरणात सीबीआय लागली कामाला; उद्या मुंबईत दाखल होणार, महाराष्ट्र सरकार निर्णयाला देणार आव्हान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?