पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकी वरील पती-पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे दोन तुकडे झाले तर कार पलटी झाली आहे. कार चालक जखमी झाला आहे. Pandharpur | In a terrible accident, husband and wife died, the two-wheeler broke into two pieces and the jeep overturned in Satara
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत, सातारा ते भाळवणीमार्गे पंढरपूर जाणाऱ्या रोडवर मौजे उपरी हद्दीत नॅशनल हयवे साताराकडून पंढरपूरच्या दिशेने सायकल (MH-11 DF-0769) व पंढरपूरकडून साताराकडे चार चाकी फोर्ड ( MH-13 BN -4145 ) यांचा जोरात अपघात होऊन मोटरसायकल वरील पती-पत्नी जागीच मयत झाले आहेत.
यामध्ये प्रकाश भुजबळ आणि लक्ष्मी भुजबळ (रा शेनवाडी ता. खटाव जि. सातारा ) यांचा जागेवर मृत्यू झाला आहे तर कारचालक संजय नागणे (रा. उपरी ता. पंढरपूर) हे जखमी झाले आहेत. कारचालक संजय नागणे यांच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 वृद्ध सासूला घराबाहेर काढणाऱ्या सून आणि नातवावर गुन्हा दाखल
पंढरपूर : 90 वर्षाच्या वृद्ध सासूला सातत्याने घालून पाडून बोलून घरातून बाहेर काढण्याच्या दृष्ट हेतूने वृद्ध सासूस घराबाहेर काढल्यामुळे ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण व संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत सून आणि नातवावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आजारी असलेल्या सुमन शिवदास थिटे (वय 90, रा. गाताडे प्लॉट मनीषा नगर पंढरपूर) ह्या आपल्या मयत मुलाच्या घरात राहत होत्या. वयोवृद्ध सासू घरात राहू नये, यासाठी सून ललिता शेखर थिटे आणि नातू अभिजित शेखर थिटे हे नेहमी वृद्ध अजित घालून पाडून बोलून घराबाहेर काढत होते. वृद्ध सासूस न सांभाळण्याच्या दृष्टीने आणि सासूचे संरक्षण करणे हे कर्तव्य प्राप्त असताना पूर्णपणे त्यांचा त्या करण्याच्या दृष्टीने वृद्ध सासूला घराबाहेर काढले.
या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण व संरक्षण अधिनियम या कायद्यानुसार सुमन थिटे यांच्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.