Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुशांतप्रकरणात सीबीआय लागली कामाला; उद्या मुंबईत दाखल होणार, महाराष्ट्र सरकार निर्णयाला देणार आव्हान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

सुशांतप्रकरणात सीबीआय लागली कामाला; उद्या मुंबईत दाखल होणार, महाराष्ट्र सरकार निर्णयाला देणार आव्हान

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 6:57 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर आता सीबीआयची टीम उद्या गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहे. ही टीम मुंबईत येऊन सुशांतच्या घराची पाहणी करून नंतर मुंबई पोलिसांचीही भेट घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या येणाऱ्या सीबीआय एसआयटीच्या टीममध्ये दोन एसपी आणि एका तपास अधिकाऱ्याचा समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे सीबीआयच्या टीमनेही तपास कामाला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीबीआय एसआयटीची टीम उद्या मुंबईत येणार आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापन केली होती.

ही टीम मुंबईत आल्यावर सुशांतच्या घराची पाहणी करणार आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांची भेट घेणार आहे. यावेळी मुंबई पोलिसांकडून सीबीआयला सुशांतप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीआय मुंबई पोलिसांकडून सुशांतप्रकरणाची केस डायरी आणि शवविच्छेदन अहवालही घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. बिहार सरकार या प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस करण्यास सक्षम असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

* महाराष्ट्र सरकार निर्णयाला देणार आव्हान

मुंबई पोलिसांनी तपास केलेला नसून केवळ चौकशी केली आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पूर्णपणे सीबीआयकडे सोपवले आहे. या पुढे या प्रकरणात कोणताही एफआयआर दाखल झाल्यास तो सीबीआयच पाहण्याचे काम करेल, असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे वृत्त आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सीबीआय #कामालालागली #मुंबईत #सुशांतच्याघरी #राज्यसरकार #आव्हान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आंतरजिल्हा एसटी प्रवासाला दिली मंजुरी; महामंडळाच्या मोकळ्या जागेवर इंधनपंप चालू होणार
Next Article मोठा निर्णय : सरकारी नोकरभरतीसाठी देशभरात आता एकच परीक्षा; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?