Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट । कॉलेजच्या कबड्डी स्पर्धेत काठीने मारहाण; चौदाजणांवर गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अक्कलकोट । कॉलेजच्या कबड्डी स्पर्धेत काठीने मारहाण; चौदाजणांवर गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2022/12/31 at 5:15 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर – कॉलेजच्या कबड्डी स्पर्धेच्या वेळी किरकोळ भांडणावरून काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले. ही घटना अक्कलकोट येथील फत्तेसिंह ग्राउंडवर बुधवारी (ता. 28) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात अक्कलकोट उत्तरच्या पोलिसांनी १४ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून काही जणांना अटक केली. Akkalkot. beaten with a stick in a college kabaddi tournament; Crime against fourteen persons

यासंदर्भात स्वामीनाथ महेश आडवीतोटे (वय १९ रा. आझाद गल्ली, अक्कलकोट) या विद्यार्थ्याने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याच्या कॉलेजची कबड्डी स्पर्धा असल्याने तो मित्रासह फत्तेसिंह ग्राउंडवर गेला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास मैदानात काही जणांचे भांडण सुरू झाले होते. त्यावेळी स्वामीनाथ आडवीतोटे आणि त्याचा मित्र समर्थ गवंडी हे भांडणाच्या ठिकाणी गेले होते.

त्यावेळी तू आमच्याकडे का बघतो, असे म्हणत प्रकाश राठोड, आकाश राठोड,आनंद राठोड,अनिकेत राठोड, सोहेब बिराजदार,आकाश चव्हाण, अरबाज शेख (सर्व रा.शिवाजीनगर तांडा) आणि अन्य ७ जणांनी मिळून दोघांना काठी आणि लाथाबुक्क्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यात दोघे जखमी झाले. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास फौजदार पुजारी करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● मोहोळ येथे दिवसा घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल

सोलापूर – एका विवाहितेच्या घरात दिवसा घुसून तिला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना मोहोळ परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.

या प्रकरणात मोहोळच्या पोलिसांनी अनिरुद्ध भाऊ शिंगाडे (रा.सारोळे ता.मोहोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ती महिला दुपारच्या सुमारास आपल्या घरात मुली सोबत काम करीत होती. त्यावेळी अनिरुद्ध शिंगाडे हा तिच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. तिच्याशी असभ्य वर्तन करीत हाताने मारहाण केली.

मदतीसाठी तिने शेजारच्यांना मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केली असता आरोपीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन फेकून दिला. अशी नोंद मोहोळ पोलिसात झाली. पुढील तपास महिला हेड कॉन्स्टेबल नागरे या करीत आहेत.

 

● गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक
सोलापूर : शहरातील सराफ बाजार, मधला मारुती आदी परीसरात सण उत्सवाच्या वेळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहक महिलाच्या पर्समधुन गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान दागिने, रोख रक्कम नकळत सफाईदारपणे चोरी करणारी महिला चोरीचे दागिने विक्री करण्याकरीता येणार असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांना माहिती प्राप्त झाली होती.
त्यानुसार कुसुमराज मल्टीपर्पज हॉल, बिलाल नगर  या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचुन महिला पोलीस अंमलदारामार्फत सुचित्रा ज्ञानेश्वर जाधव (वय-३५, रा. साईबाबा मंदीरच्या पाठीमागे, होटगी, दक्षिण सोलापूर) हिला ताब्यात घेऊन अधिक सखोल तपास केला असता,  मधला मारुती परिसरात तिने चोरी केल्याचे कबुली दिली.
जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात यापूर्वी तिच्याविरुद्ध तीन गुन्हे केल्याची नोंद झाली आहे.या तीन गुन्ह्यामध्ये ६४ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळुन आले आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Akkalkot #beaten #stick #college #kabaddi #tournament #Crime #fourteen #persons, #अक्कलकोट #कॉलेज #कबड्डी #स्पर्धा #काठी #मारहाण #चौदाजण #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रस्तावित पंढरपूर कॅरिडॉरमधून होळकर वाडा वगळा; पुरातत्व विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Next Article बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची 2 मार्चपासून

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?