पुणे : पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. लक्ष्मण जगताप यांना कर्करोग झाला होता. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मण जगताप हे तीन वेळा पिंपरी चिंचवडचे आमदार राहिले आहेत. ते दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. अवघ्या 12 दिवसात भाजपने दोन आमदार गमावले आहेत. BJP MLA Laxman Jagtap passes away, second shock after Mukta Tilak Pimpri Chinchwad Pune
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहत म्हटले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना.
जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यादेखील कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होत्या. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी प्रकृती चिंताजनक असतानाही भाजपसाठी मतदान केलं होतं. त्यामुळे या दोन्ही आमदारांचे विशेष आभार मानले होते. 22 डिसेंबर रोजी मुक्ता टिळक यांचं निधन झालं तर आज मंगळवारी लक्ष्मण जगताप यांच्या निधनाचं वृत्त आलं आहे.
पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. शहराच्या राजकारणातील ढाण्या वाघ गेल्याची भावना गेल्याची भावना व्यक्त होत आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.
Dev_Fadnavis: गेल्याच आठवड्यात मुक्ताताई टिळक आपल्यातून निघून गेल्या आणि आज लक्ष्मणभाऊ. पक्षाची मोठी हानी त्यांच्या जाण्याने झाली आहे. महापौर आणि आमदार म्हणून त्यांनी विकासाच्या प्रक्रियेत मोठे योगदान दिले.#LaxmanJagtap pic.twitter.com/IgStI1c7N4
— Devendra Fadnavis Fan (@Dev_Fadanvis) January 3, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळी नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले. आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. आता जगताप यांच्यासारखा मोठा आधारस्तंभ निखळल्याने भाजपाला पोरकेपण आले आहे. आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते.
एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक दमदार आमदार म्हणून लक्ष्मणभाऊ यांच्याकडे पाहिले जायचे. १९८६ मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते. पुढे हवेली विधानसभेसाठी प्रबेळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते, पण विलास लांडे यांना संधी मिळाली होती. नंतर विधान परिषदेसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकित अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता.
राज्यात ती निवडणूक खूपच गाजली होती. २००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली होती. नंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून त्यांनी अत्यंत कडवी झूंज दिली, पण तिथे श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून विजयी झाले.
नंतरच्या काळात बदलती राजकिय समिकरणे लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभेतून आमदारकी केली. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमदार जगताप यांचे नाव मंत्री पदासाठी आघाडीवर होते. आता त्यांच्या निधनामुळे भाजपा पुढे नेतृत्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.