Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवड बेकायदेशीर, शिंदे गटाचा दावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवड बेकायदेशीर, शिंदे गटाचा दावा

Surajya Digital
Last updated: 2023/01/10 at 6:54 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर केला आहे. शिवसेना कोणाची याबाबतच्या निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शिंदे गटाने आज पक्षावर दावा करताना उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. Uddhav Thackeray’s election as party chief is illegal, Election Commission claims of Shinde group

 

 

एकनाथ शिंदे यांची निवड जुलै 2022 ही राष्ट्रीय कार्यकारणीने केली आहे, त्यामुळे ही निवड योग्य असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचे शिवसेना पक्षप्रमुख हे पद बेकायदेशीर आहे, असा दावा शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी केला आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी घटनेत बदल केले आणि शिवसेना पक्षप्रमुख व मुख्य नेता असे पदे निर्माण केले असाही दावा त्यांनी केला आहे. तर राष्ट्रीय कार्यकारणीत शिंदेंची मुख्यनेता म्हणून निवड करण्यात आली होती, असा युक्तीवाद त्यांनी केला आहे.

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज झालेली सुनावणी संपली आहे. यावेळी दोन्ही गटाने आपली बाजू मांडली. पक्ष आणि धनुष्यबाण आमचाच आहे, असा दावा ठाकरे आणि शिंदे गटाने केला आहे. यावर आता पुढील सुनावणी 1 आठवड्यानंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी बेकायदेशीरपणे पक्षप्रमुखपद बळकावले, असा युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. तर आम्हीच खरी शिवसेना असे ठाकरे गटाने म्हटले.

शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रित होती. पण, नंतर ती बदलत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेबद्दल निवडणुक आयागोसमोर माहिती दिली. चर्चेदरम्यान जेठमलानी यांनी पक्षाची रचना काय हे वाचून दाखवली. बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा खोटारडेपणा आहे. हे बदल बेकायदेशीर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत असं महेश जेठमलानी यांचे एकनाथ शिंदे गटातर्फे म्हणणे आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्रांच्या 4 मोठ्या बॅगा आणल्या गेल्या. दोन्ही गटाकडून लाखो प्रतिज्ञापत्र आणि पुरावे निवडणूक आयोगात दिली गेली. शिंदे गटाची सादर कागदपत्रे बोगस, असा ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला.

ठाकरे गटाकडून 22 लाख 24 हजार 950 तर शिंदे गटाकडून 4 लाख 51 हजार 127 इतके प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटाकडून लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. लाखोंच्या संख्येने शिंदे गटाकडून चार बॅगमधून आणलेले कागदपत्रे जमा करण्यात आले आहेत.

 

शिंदे गटाकडून प्राथमिक सदस्य 4 लाख 48 हजार आहेत. 13 खासदार आणि 40 आमदारांसह संघटनात्मक प्रतिनिधी 711 आहेत.शिंदे गटाकडे एकूण 4 लाख 51 हजार 127 एवढी प्रतिज्ञापत्र असून आज शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे गटाकडून कागदपत्रे आणली गेली. कागदपत्रांचे गठ्ठे एका मोठ्या खोलीत जमा करण्यात आली असून सुरक्षाव्यवस्थाही केली गेली आहे.

 

□ सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

 

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी आता थेट 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर आता पुढल्या महिन्यात निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे आहे. पण हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

You Might Also Like

दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात

पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार

आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे

आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद

TAGGED: #UddhavThackeray's #shivsena #election #partychief #illegal #Election #Commission #claims #Shindegroup, #शिवसेना #पक्षप्रमुख #उद्धवठाकरे #निवड #बेकायदेशीर #शिंदेगट #निवडणूक #आयोग #दावा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात तब्बल 101 एटीएम कार्ड केले जप्त; दोन आरोपी अटक
Next Article सोलापूर | जिल्हा नियोजनच्या माजी सदस्यावर विनयभंगाचा गुन्हा

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?