Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर | जिल्हा नियोजनच्या माजी सदस्यावर विनयभंगाचा गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापूर | जिल्हा नियोजनच्या माजी सदस्यावर विनयभंगाचा गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2023/01/10 at 9:09 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पंढरपूर : आमच्या शेतामधून वाहने का घेऊन जाता अशी विचारणा करणाऱ्या महिलेस जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष सुळे व त्याच्या मेव्हण्याने जबर मारहाण केली असून याप्रकरणी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Solapur | A case of molestation against former member of district planning, Pandharpur

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ मोहोळ नगरपरिषदेतून 35 हजार गायब, ‘ना दाद ना फिर्याद’ अशी अवस्था

तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेची तालुक्यातील ईश्वरवठार येथे शेती असून सोमवारी सदर महिला आपल्या शेतात काही कामानिमित्त गेली होती. यावेळी सदर महिलेने संतोष सुळे याच्या शेतातील गड्यास तुम्ही आमच्या शेतामधून न विचारता वाहने का घेऊन जाता असे विचारले. यावेळी संतापलेल्या संतोष सुळे याने या महिलेस लाथा बुक्क्याने मारहाण केली तसेच मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केले. तर त्याचा मेव्हणा बाळू गावडे याने देखील पीडित महिलेस मारहाण करून सदर तिचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले.

संतोष सुळे व बाळू गावडे यांच्या विरोधात मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ मोहोळ नगरपरिषदेतून 35 हजार गायब, ‘ना दाद ना फिर्याद’ अशी अवस्था

 

मोहोळ : मोहोळ नगर परिषदेच्या कार्यालयातून मागील आठ दिवसापूर्वी वसुलीच्या पैशातील ३५ हजार रुपये गायब होऊनही याबाबत वरिष्ठांनी दखल न घेतल्याने ना दाद ना फिर्याद अशी परिस्थिती संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झाली आहे.

याबाबतची माहिती अशी की संगीता कुंभार ह्या मोहोळ नगर परिषदेमध्ये काम करतात. नगर परिषदेच्या ऑफिसमधील उतारे देणे त्याचबरोबर घरपट्टी पाणीपट्टीची वसुली करणे. यासारखी कामे त्या नियमित करत असतात. ४ जानेवारी रोजी बुधवारी वसुली करून आल्यानंतर ऑफिसमध्ये भरणा करण्यासाठी थांबल्या त्याचबरोबर पर्स मध्ये पैसे ठेवून बाकीची कामे ही त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी ठेवलेले पैसे भरणा करण्यासाठी काढले असता त्यामध्ये त्यांनी मोजून लावून ठेवलेल्या नोटांमधून ३५ हजार रुपये कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 

याबाबत तातडीने ही बाब त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घातली वरिष्ठांनी या घटनेची शहानिशा न करता याबाबत विचारपूस न करता त्यांनाच पूर्ण रक्कम भरण्याची तंबी दिली. त्यांनी बाहेरून ३५ हजार रुपये आणून त्या रकमेची पूर्तता केली व त्या दिवशीचा भरणा पूर्ण केला परंतु नंतरच्या कालावधीमध्ये आठ दिवसांमध्ये कार्यालयामध्ये चोरी होऊन वरिष्ठांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.

 

 

कार्यालयामध्ये सीसीटीव्ही असतानाही भर दिवसा होणाऱ्या चोरीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेबाबत मोहोळ येथील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ३५ हजार रुपये भर दिवसा पर्समधून काढून घेऊनही ना दाद ना फिर्याद अशी संगीता कुंभार यांची अवस्था झाली आहे. ही घटना त्यांनी स्वतः प्रतिनिधीशी संपर्क साधून या घटनेबाबत न्याय मिळवण्याची मागणी केली आहे.

You Might Also Like

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

TAGGED: #Solapur #case #molestation #former #member #district #planning #Pandharpur, #सोलापूर #जिल्हा #नियोजन #माजी #सदस्य #विनयभंग #गुन्हा #सोलापूर #पंढरपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवड बेकायदेशीर, शिंदे गटाचा दावा
Next Article सोलापुरात स्वीकृत नगरसेवकांची संख्या दुपटीने वाढणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?