□ प्रबोधनाचे विचार महिलांनी घराघरात पोहोचवावेत : डॉ. आसबे
वेळापूर : रमेश बनकर ट्रस्टच्या माध्यमातून विधवा भगिनींना हळदी कुंकू लावून, त्यांची ओटी भरून मकर संक्रांतीचे वाण देऊन जो मान सन्मान दिला ते विचार महिलांनी घरा घरात पोहोचवावेत, असे आवाहन कामधेनूसेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे यांनी केले. In Solapur, widow sisters were honored by planting turmeric kunkums and offering Sankranthi varieties
वेळापूर ( ता. माळशिरस) येथे स्व. श्री रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने विधवा भगिनी व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, कामधेनुसेवा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण आसबे, वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव, माधव पाटील उस्मानाबाद, निवृत्ती बनकर, कृष्णा माळी, स्व. श्री. रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा साधना बनकर यांच्यासह ७०० ते ८०० महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे, विधवा भगिनी, उपस्थित महिला वर्ग या सर्वांचे साधना बनकर यांनी स्वागत केले. यानंतर दीप प्रज्वलन ऐएसपी हिम्मत जाधव, साधनाताई बनकर, वेळापूर सपोनि निलेश बागाव यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या कार्यक्रमासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
यावेळी विधवा भगिनी यांना स्व. श्री. रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने प्रमुख पाहुणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, समाजभूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे, वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव, निवृत्ती बनकर, कृष्णा माळी, रमेश बनकर ट्रस्टचे अध्यक्ष साधना बनकर व ७०० ते ८०० महिलांच्या उपस्थितीत विधवा भगिनी सुनंदा सुतार, माधुरी मोरे, जयश्री शिंदे, छाया वाघमारे, बेबी साठे, अर्चना उरणे, वंदना साठे, स्मिता बनसोडे, जयश्री रजनीकांत शिंदे, मनीषा थिटे, वनिता जाधव, उज्वला खांडेकर, मालन सुतार, मुमताज काझी, प्रतिभा साखळकर, उज्वला जगताप, आशा वाघमारे या विधवा भगिनींनी सौभाग्य अलंकार प्रदान करून स्वर्ग श्री रमेश बनकर ट्रस्टच्या वतीने विधवा भगिनींना साधना बनकर यांनी हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरून मकर संक्रांत निमित्त वाण देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला.
कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे म्हणाले, महाराष्ट्रात माझ्या चार हजार विधवा भगिनी माझ्या बहिणी आहेत, त्यांचे दुःख काय आहे ते मला माहीत आहे असे सांगून त्या भगिनींच्या व्यथा सांगताना त्यांना गहिवरून आले बोलताना त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या त समोर बसलेल्या महिलांनाही अश्रू अनावर झाल त्याही व्यथा ऐकून रडू लागल्या.
यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव म्हणाले की विधवा भगिनींना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ह स्तुत्य असा उपक्रम आहे. पतीच्या मृत्यूनंतर वैधव्ट आलेल्या विधवा भगिनींचे दुःख काय असते ह निर्दयी समाज जाणू शकत नाही परंतु त्या महिलांन आयुष्यभर स्वतःच्या विचारांमध्ये आणि समाजाच्य रूढी परंपरेच्या चौकटीमध्ये राहावे लागते, आज त्या प्रथा रूढी परंपरा मोडण्याचे काम, ती चौकट तोडण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. महिलांना अनिष्ट रूढी परंपरेला यांना छेद देणाऱ्या विधव भगिनींना सौभाग्याचे अलंकार घालण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या साधनाताई बनकर यांचे कौतुक करूयात, असे हिम्मतराव जाधव म्हणताच उपस्थित सर्वच महिलांनी टाळ्यांचा कडकडाट साधना बनक यांचे कौतुक केले.
कार्यक्रम पार पडण्यासाठी एस के नदाफ, एसजे इंगळे, नफिसा शेख, दुर्गा बनसोडे नीलम बनसोडे, वैशाली इंगोले, ताहिरा बागवान जयश्री काटे, हेमलता सुरवसे, शाहिदाबी, राजश्री ढोण, राणी गाडे यांच्यासह असंख्य महिलांन परिश्रम घेतले.