□ डिझेल टाकी फुटल्याने कंटेनरचे टायर जळून खाक, कंटेनरच्या केबिनमध्ये पोचली आग
सोलापूर : साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कंटेनरने समोरून जोरात धडक दिली. त्यात ट्रॅक्टर चालक कल्लप्पा भुताळी पुजारी (वय-४२) याचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. container crash into tractor carrying sugarcane; Tractor driver standing Solapur
पुण्याहून विजयपूरकडे जाणारा कंटेनर भरधाव वेगाने जात होता. गुरूवारी (ता. 12 ) रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रॅक्टर ऊस घेऊन विरूद्ध दिशेने सोलापूरकडे येत होता. कंटेनर चालकाला त्याचा अंदाज आलाच नाही. ट्रॅक्टर व कंटेनरची समोरासमोर जोरात धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की, ट्रॅक्टरचे बोनेट पूर्णपणे चेमटले होते. डिझेल टाकी फुटल्याने कंटेनरचे टायर जळून खाक झाले होते. लागलेली आग कंटेनरच्या केबिनपर्यत आग पोचली होती. जखमी कंटेनर चालक त्यात भाजला असून त्याच्या पोटाला व पाठीला जखम झाली आहे.
□ हायवा ट्रकची कारला धडक; ५० हजाराचे नुकसान
सोलापूर : सोलापूरहून तुळजापूरकडे कुटुंबासह दर्शनाकरिता निघालेल्या मुंबईतील एका व्यक्तीच्या कारला पाठीमागून धडक दिल्याने कारचे पन्नास हजाराच्या आसपास नुकसान झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
घटनेची हाकिकत अशी की, मुंबई येथील मधुसूदन यशवंत पेंडणेकर (वय-५९ रा.बांद्रा ईस्ट,मुंबई) हे आपल्या कुटुंबासह तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता तुळजापूरकडे निघाले होते. जुना बोरामणी नाका येथे आज शुक्रवारी (ता. 13) सकाळी ११ वाजता सुमारास पाठीमागून आलेल्या हायवा ट्रक क्रमांक एम.एच.१३ सीयु.६१०० च्या चालक सोनप्पा सुभाष गायकवाड (रा.भोगाव ता. उत्तर सोलापूर) यांनी आपल्या ताब्यातील ट्रकने कारला धडक दिली.
यात कारच्या उजव्या बाजूचे टायर, दोन दरवाजे, काचा असे तुटून जवळपास ५० हजार रुपये नुकसान झाले. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भोगशेट्टी हे करत आहेत.
□ एटीएमचे कार्ड चोरून ७३ हजार रुपये पळविले