□ लिटिल चॅम्प फेम मुग्धा वैशंपायन आणि अमोल निसळ यांचे शास्त्रीय गायन
□ पं. नयन घोष यांचे सितार वादन आणि पं. रोणु मजुमदार यांचे होणार मनमोहक बासरी वादन
सोलापूर – प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने येत्या २१ आणि २२ जानेवारी २०२३ रोजी ‘प्रिसिजन संगीत महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा आठवे वर्ष असून हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा आणि प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे चेअरमन यतिन शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. Music Festival of Precision from Saturday in Solapur Flute Playing Classical Singing Little Champs
जानेवारी महिना म्हणजे सोलापूरमध्ये उत्सवांचा माहोल असतो, नववर्षाच्या स्वागताबरोबर संक्रांत अक्षता सोहळा गड्डा यात्रेची नुसती धामधूम संपता संपता प्रिसिजन संगीत महोत्सवाची मेजवानी सोलापूरकरांना मिळणार आहे.
प्रिसिजन संगीत महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुहासिनी शहा म्हणाल्या, या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि. २१ जानेवारी) पहिल्या सत्रात लिटिल चॅम्प फेम मुग्धा वैशंपायनचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना तबल्यावर अभिजित वारटक्के तर हार्मोनियम वर मिलिंद कुलकर्णी हे साथ करतील. दुसन्या सत्रात पंडित नयन घोष यांचे सितार वादन होईल त्यांना ईशान घोष हे तबल्यावर साथसंगत करतील.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पहिल्या सत्रात अमोल निसळ यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा अनुभव रसिकांना घेता येईल. त्यांना राहूल गोळे व प्रशांत पांडव हे अनुक्रमे हार्मोनियम व तबला वर साथ देतील. अंतिम सत्रात पंडित रोणु मजुमदार यांचे मनमोहक बासरी वादन होईल. त्यांचे बासरीवादन अनुभवणं ही रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी असेल. त्यांना तबल्यावर पंडित अरविंदकुमार आझाद हे साथ करतील.
पुण्यातील ‘सवाई गंधर्वच्या धर्तीवर सोलापूरातही पूर्णपणे शास्त्रीय संगीताला समर्पित महोत्सव व्हावा या उद्देशाने प्रिसिजन फाउंडेशन मागील ७ वर्षापासून प्रयत्नशील आहे. सोलापुरातील रसिकांना या गीताची मेजवानी अनुभवता यावी हाच प्रयत्न आहे. सोलापूरकरांना महोत्सवाचा आनंद निःशुल्क घेता येईल. निःशुल्क प्रवेशिका (फ्री पासेस) मंगळवार दि. १७ जानेवारी पासून हुतात्मा स्मृति मंदिरात सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उपलब्ध होतील. रसिकांनी आपले नाव नोंदवून प्रवेशिका घ्याव्यात. त्यावर आसन क्रमांक नसेल. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर बसण्याची सोय आहे.
प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस सायंकाळी ठीक ६.२५ वाजता कार्यक्रम सुरू होईल रसिकश्रोत्यांनी जागतिक पातळीवरील या कलावंतांच्या स्वराविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहासिनी शहा यांनी केले. या पत्रकार परिषदेला माधव देशपांडे, संदीप पिस्के उपस्थित होते.