● पंतप्रधान मोदींनी दौऱ्यात मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले
● मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक; जगभरात मोदींच्या नावाचा डंका
मुंबई : मुंबईत विकास कामे जलद गतीने करण्यासाठी भाजप आणि एनडीएच्या सरकारला पाठिंबा द्या. मुंबईत २०१४ पासून विकासकामांना गती मिळाली. मात्र, मधल्या काही काळात विकासाचा वेग मंदावला होता. Delhi, Maharashtra and Mumbai need one government – Prime Minister Narendra Modi Eknath Shinde Devendra Fadnavis पण पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा विकासाला वेग आला आहे”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली, महाराष्ट्र आणि मुंबईत एकच सरकार हवे असे सांगत मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी (ता. 19) मुंबईत विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले “डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. येत्या २५ वर्षांत राज्यातील अनेक शहर देशांच्या विकासाला चालना आहेत. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. हे काम शिंदे – फडणवीसांच्या माध्यमातून होत आहे. शिंदे – फडणवीस यांच्या मुंबईत आहे.
जोडीचे सरकार येताच महाराष्ट्रामध्ये सर्व काही कामांना वेग आला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व काही
ट्रॅकवर येत आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस यांना धन्यवाद – देतो”, असं ते म्हणाले. यावेळी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं आहे. आता मेट्रोचा हा सोहळा आपण करतो आहोत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई जोडलं गेलं. मेट्रोच्या रूपाने आमचं दुसरं स्वप्न पूर्ण झालं आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले उपमुख्यमंत्री यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करत फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधान मोदी सगळीकडेच लोकप्रिय आहेत पण दाव्यासह सांगतो की, लोकप्रियतेची कोणती स्पर्धा झाली तर आपल्या लोकप्रियतेमध्ये नंबर १ वर मुंबई असेल. एवढं प्रेम मुंबईकरांचं तुमच्यावर आहे, असे सांगितले.
□ मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक
जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा डंका आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बीकेसीवरील सभेत म्हटले आहे. ‘दावोस येथे गुंतवणूक आणण्यासाठी गेले असता, याचा आपण जवळून अनुभव घेतला, या ठिकाणी अनेकजण मोदींबाबत विचारत होते, अनेक देशांचे नेते मला दावोसमध्ये भेटले आणि आम्ही मोदींचीच माणसे असल्याचे सांगितल्यावर अनेकांनी माझ्यासोबत सेल्फीही काढल्या,’ असे शिंदे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. मात्र, ‘हे उद्घाटन त्यांच्या हस्ते होऊ नये, अशी काही लोकांची इच्छा होती, पण नियतीने मोदींच्याच हस्ते आज उद्घाटन घडवून आणले,’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते बीकेसी येथील सभेत बोलत होते. मोदींनीच या मेट्रोचे भूमिपूजन केले होते, मोदींमुळेच राज्यात विकासकामे होत आहेत, असेही शिंदेंनी सांगितले.
□ बेरोजगारीच्या प्रश्नांवर मोदींचे मौन, पटोलेंची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, देशात अनेक वर्ष फक्त गरिबीच होती असा आरोप करताना मोदी सरकारच्या काळात गरिब आणखी गरिब झाला याचे जाणीव मोदींनी कशी झाली नाही. आपले सरकार देशातील ८० कोटी लोकांना रेशनवर मोफत धान्य देते असे मोदी स्वतःच सांगतात. देशातील गरिबी कमी झाली आहे असे मोदींना म्हणायचे असेल तर हे ८० कोटी गरिब आले कोठुन ? एकूणच मोदींनी नेहमीप्रमाणे प्रचारमंत्रीपदाला साजेशे प्रचारी भाषण केले.
□ कर्नाटकवर कोट्यवधींच्या योजनांची बरसात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारायणपूर डाव्या काठाच्या कालव्याचा विस्तार, नूतनीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की, कलबुर्गी, यादगिरी आणि विजयपूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना नारायणपूर डाव्या किनारी कालव्याच्या विस्ताराचा थेट लाभ मिळणार आहे. कर्नाटकात येणाऱ्या सुरत – चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या भागाचे कामही आज सुरू झाले आहे. यामुळे कलबुर्गी आणि यादगिरीमध्ये राहण्याच्या सुविधेत वाढ होणार असून, अनेक लोकांना इथे राहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले.