Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: LIC agent फसवणूक : सोलापुरात एलआयसी एजंटासह तिघांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

LIC agent फसवणूक : सोलापुरात एलआयसी एजंटासह तिघांवर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/01/20 at 8:08 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : एलआयसी विमा पॉलिसीची रक्कम परस्पर स्वतःच्या नावे करून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एलआयसी एजंटासह तीन जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fraud: Criminal case registered against three including LIC agent in Solapur

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ अज्ञात चोरट्याने पळविले दोन मोबाईल□ चोरट्याने पळविली दुचाकी

 

ही घटना दि.१८ ऑगस्ट २०२१ पासून ते आजतागायत पर्यंत घडली. याप्रकरणी आफरीन जावेद शेख (वय-२१,रा. मुक्काम महात्मा गांधीनगर,जि. लातूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सासु हसीना फैजअहमद शेख, सासरे फैजअहमद बशीरअली शेख व एलआयसी एजंट आर.एस कराळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी यांचे पती जावेद फैजअहमद शेख हे हयातीत असताना त्यांनी त्यांच्या नावे जीवन विमा महामंडळ सोलापूर येथे पॉलिसी उतरवून विमावर नॉमिनी म्हणून फिर्यादी आफरीन व फिर्यादी यांची सासू हसीना यांना ५०-५० टक्के हक्कदार केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीचे मृत्यू झाला व त्यांच्या नावे मिळणारी विमा पॉलिसी रक्कम २३ लाख ४२ हजार रुपये रक्कमेपैकी फिर्यादी यांच्या हिश्याचे विमा पॉलिसीची रक्कम ११ लाख ७२ हजार रुपये ही फिर्यादी आफरीन यांना मिळू नये म्हणून वरील संशयित आरोपी यांनी संगणमत करून मृत्यू दाव्या संदर्भात एलआयसी ऑफिस येथे फिर्यादी यांच्या नावे खोटा अर्ज सादर केला.

बनावट सह्या करून विम्याची रक्कम २३ लाख ४२ हजार रुपये ही हसीना शेख यांनी परस्पर स्वतःच्या नावे घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. मिळालेली विम्याची रक्कम फिर्यादी यांच्या हिश्याची विमा पॉलिसीची रक्कम ११ लाख ७२ हजार रुपये फिर्यादीस न देता त्या रक्कमेपैकी ११ लाख ४७ हजार ९३३ रुपये ही फिर्यादी यांची मुलगी सबिरा शेख हिच्या नावे पॉलिसी काढून काही माहिती न देता परस्पर रक्कम उतरवली. उतरवलेल्या पॉलिसीवर होल्डर म्हणून फिर्यादी यांचे सासरे फैजअहमद शेख यांनी त्यांचे स्वतःचे नाव लावले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोसई डोंगरे हे करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ अज्ञात चोरट्याने पळविले दोन मोबाईल

 

सोलापूर : अज्ञात चोरट्याने दोन महागडे कंपनीचे मोबाईल चोरून नेल्याची घटना दि.१९ जानेवारी रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील शेड हॉल क्रमांक एक समोर घडली.

याप्रकरणी सोमनाथ गुंडु पवार (वय-२२,रा. मु.पो. मराठवाडी, ता.अक्कलकोट, सोलापूर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल व तसेच विठ्ठल सुतार यांचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने बुलेरो पिकअप गाडीच्या समोरील बाजूस ठेवलेला असताना चोरून नेला आहे. असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख हे करीत आहेत.

□ चोरट्याने पळविली दुचाकी

सोलापूर : अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम.एच.१३.डीए.७७८३ ही हाजी हजरत खान मस्जिद मुरारजी पेठ येथे पार्क करून ठेवलेली असताना चोरून नेली आहे. ही घटना दि.१८ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी इम्रान म.अय्युब सय्यद (वय-३५,रा.शिवगंगा नगर भाग -१, मजरेवाडी ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करित आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #फसवणूक #सोलापूर #एलआयसी #एजंट #तिघांवर #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऊसाची काटामारी झाली ‘सरकार मान्य’, कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
Next Article Solapur court अनैतिक संबंधातून मित्राचा दगडाने ठेचून खून; आरोपीला जन्मठेप, 75 हजार रुपये दंडाची शिक्षा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?