सोलापूर – विधवा बहिणी सोबत अनैतिक संबंध असल्याचा कारणावरून आपल्या मित्राचा बियरची बाटली आणि दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात 75 हजार रूपयांचा दंड सुनावला. हा दंड मयताच्या पत्नी आणि मुलास नुकसान भरपाई देण्याचा आदेश झाला आहे. The stoning of a friend through an immoral relationship; Solapur court sentenced the accused to life imprisonment and a fine of 75 thousand rupees
विशाल उर्फ सायबा सुरवसे (वय २३ रा.आदर्श नगर,शेळगी) असे आरोपीचे नाव आहे. याला जन्मठेप आणि ७५ हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्रन्यायाधीश आर. एन.पांढरे यांनी आज शुक्रवारी ठोठावली. दंडाच्या वसूल रकमेतून ५० हजार रुपये मयताची पत्नी आणि २५ हजार रुपये मयताच्या लहान मुलास नुकसान भरपाई देण्याचेही आदेशात नमूद आहे. नितीन नागनाथ उबाळे (वय ३२ रा. भीमनगर,शेळगी) असे मयताचे नाव आहे.२६ मार्च २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचा शेळगी येथील महालक्ष्मी सोसायटीच्या पाठीमागे नागोबा मंदिरा समोरच्या मैदानात खून झाला होता.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, या घटनेतील मयत नितीन उबाळे हे विवाहित असून ते महापालिकेत कंत्राटी काम करीत होते. तर आरोपी विशाल सुरवसे हा त्यांच्या लांबचा नातेवाईक असून तो देखील शेळगी परिसरात राहण्यास होता. आरोपीच्या विधवा बहिणी सोबत नितीन उबाळे याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे विशाल हा नितीन याच्यावर चिडून होता. या कारणावरून पूर्वी त्यांच्यात तक्रार देखील झाली होती.
घटनेच्या दिवशी म्हणजेच २६ मार्च २०२१ रोजी महापालिकेत काम न लागल्याने नितीन उबाळे हे कांद्याच्या पिशव्या घेऊन मार्केट यार्ड येथे विकण्यास गेले होते. रात्री घरी न आल्याने त्यांचे भाऊ महेश यांनी फोन लावला त्यावेळी नितीन याने आपण मार्केट यार्ड असून घराकडे येतो असे सांगितले होते. मात्र ते रात्री आलेच नाही.
२७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास नितीन उबाळे यांचा मृतदेह शेळगी परिसरातील नागोबा मंदिरासमोरील मैदानात खून केलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाजवळ मयताची दुचाकी आढळली होती. या घटनेची फिर्याद मयताचे बंधू परशुराम उबाळे (रा.भीमनगर, शेळगी) यांनी जोडभावी पेठ पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी विशाल सुरवसे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष दर्शनी पुरावा नव्हता.घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत या दोघांनी फ्रुट बिअरच्या बाटल्या विकत घेतल्या होत्या. दारू पिऊन हॉटेलमध्ये जेवण करताना तसेच दुचाकी वरून दोघे जाताना कांही लोकांनी पाहिले होते. त्या साक्षीदारांची साक्ष, मयत आणि आरोपी यांच्या कपड्यावरील रक्ताचे डाग, परिस्थितीजन्य पुरावा, फिर्यादीची साक्ष आणि सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
तसेच मयताची पत्नी पूजा उबाळे यांना ५० हजार रुपये तर मुलगा आनंद उबाळे (वय ५ वर्षे) याला २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश आरोपीला दिला. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीच्या वतीने ॲड गणेश पवार आणि ॲड शेंडगे यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरात आयकर विभागाचे छापे; 50 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सील
सोलापूर : सोलापुरात आयकर विभागाने चार दिवस छापे टाकले. यावेळी 50 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सील करण्यात आली आहे. आसरा चौक परिसर, हैदराबाद रोड, कुमठा नाका परिसरात बीफ, भंगार विक्री, बांधकामाचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी झाली. सोमवार ते गुरुवार असा चार दिवस छापेमारेची कारवाई झाल्याची माहिती आहे.
सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या मुळेगाव रोडवरील सोनांकूर एक्सोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसह आसरा चौक, कुमठा नाका, हैदराबाद रोडवरील भंगार विक्रेते, बांधकाम साहित्य, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने सोमवार ते गुरुवार असे चार दिवस छापे टाकले. या छाप्यांमध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचे बोगस व्यवहार आढळून आल्याची माहिती आयकर विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.
तब्बल चार दिवस एकाच वेळी अचानकपणे धाडी पडल्या होत्या. व्यापाऱ्यांना व व्यवसायिकांना काही समजण्याअगोदर आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ माजली आहे. यामुळेच इतर व्यावसायिकांची धाबे दणाणले आहेत.
आयकर विभागाने दोन महिन्यांपूर्वी शहरातील विविध रुग्णालयांवर छापेमारी करत शंभर कोटींवर घबाड जप्त केला होता. या कारवाईत शहरातील रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई झाली होती. शहरातील रुग्णालयावर झालेल्या कारवाईत 100 कोटींचा गैरप्रकार समोर आला होता.
गेले चार दिवस आसरा चौक परिसर, हैदराबाद रोड, कुमठा नाका परिसरात बीफ, भंगार विक्री, बांधकामाचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी झाली. या व्यावसायिकांनी भंगार, साहित्य विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोखीने खरेदी करत, टॅक्स चोरला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोलापुरात झालेल्या कारवाईत व्यवसायिक व व्यापारी यांमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे ५० कोटी रुपयांची तफावत आढळून आली आहे. भंगार विक्रेत्यांनी खरेदी दर कमी दाखविले आहेत. आयकर अधिकाऱ्यांनी कच्च्या नोंदी असलेली कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. रोखीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर करचोरी झाली आहे. ही करचोरी कधीपासून झाली, या करचोरीमध्ये इतर कोण-कोण सहभागी आहेत, याची तपासणी सुरू आहे.