पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज पुण्याजवळील मांजरी इथल्या संस्थेच्या आवारात पार पडली. यावेळी, शरद पवारांच्या तोंडी नेहमी साखरेचा गोडवा असते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. Chief Minister Eknath Shinde praised Sharad Pawar. Pune Cats Vasantdada Sugar Institute
शरद पवार नेहमी आपल्याला मार्गदर्शन व सुचना करत असतात. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या, असेही ते म्हणाले. या सभेला अतुल सावे, अजित पवार, जयंत पाटील यांचीही उपस्थिती होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज मांजरी इथं पार पडली. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावली. दरवर्षी या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित ही सभा पार पडत असते. राज्याचे मुख्यमंत्री देखील या सभेला येत असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे आज या सभेला हजेरी लावणार की नाही याबाबत साशंकता होती. पण मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.
यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण झाले. राज्याच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते. या संस्थेमार्फत ऊसाच्या संदर्भात विविध संशोधन, मार्गदर्शन केलं जातं. आजच्या या सभेसाठी सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील अन्य नेते देखील हजेरी लावली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यात मुख्यमंत्री शिंदेंकडून पवारांवर कौतुकाचा वर्षांव झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांच्या तोंडात साखर आहे. मला जेव्हा – जेव्हा सल्ल्याची गरज असते तेव्हा तेव्हा मी त्यांना फोन करतो आणि ते सुद्धा मला चांगले सल्ले देतात असं शिंदेनी म्हंटल आहे. शरद पवारांचे मार्गदर्शन नेहमी मिळत असत. सत्तेवर कोण आहे, हे न पाहता, पवार साहेब मार्गदर्शन करतात. मला सुद्धा जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा फोन करतात आणि सूचना देतात. सहकार क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान हे नाकारता येणार नाही, असं म्हणत त्यांनी शरद पवारांचे कौतुक केलं आहे.
पवार साहेबांनी देशात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सहकार क्षेत्रात तर शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. शरद पवार सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत. त्यानुसार शेतीत किंवा उद्योगात बदल केले, पाहिजे असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हंटल .