वेळापूर : वेळापूर येथील इंग्लिश स्कूल, वेळापूर प्रशालेचा माजी विद्यार्थी व आंतरराष्ट्रीय जलतरण पटू , राज्य क्रीडा मार्गदर्शक सुयश नारायण जाधव यांना केंद्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या अगोदर सुयश जाधव याला शिवछञपती पुरस्कार मिळाला आहे.
नोव्हेंबर २०१८ मध्ये सुयश जाधव याने पोलंड येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेऊन पन्नास मीटर बटरफ्लाय या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून भारत देशाचा मान उंचावला आहे. सुयश जाधव हा जलतरणमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी देशाचे नेतृत्व करणारा एकमेव खेळाडू होता. यापूर्वी सुयश जाधवने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये १२५ पदके मिळवली आहेत. सुयशला क्रीडाशिक्षक व वडील नारायण जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुयश जाधवला मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्यल चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, जि.प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, अॅड. सुजीतबापू कदम, दलितमिञ कदमगुरुजी, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुभाष कदम, संस्थेच्या माजी अध्यक्षा मिनाक्षी कदम, प्रियदर्शिनी कदम – महाडीक, प्रतापराव पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक रविंद्र काशिद, उप- मुख्याध्यापक सुनिल खंदारे, पर्यवेक्षक आर.बी. पवार, वेळापूर उपसरपंच जावेद मुलाणी, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद सरतापे, सत्यजीत बारुंगुळे, सतीश कदम, शिवाजी जाधव, शहनवाझ तांबोळी, जावेद आतार, रसुल आतार, सोमनाथ बनसोडे, शहाजी मंडले,अजीत बनकर, भास्कर बागल, वेळापूर ग्रामस्थ यांच्यावतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
* कसे संकट आल्याने दोन्ही हात निकामी झाले?
सुयश जाधव याचे लहानपणीच दोन्ही हात गेले होते. लहानपणी घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना घराच्या जवळून गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन हात भाजुन मोठा झटका बसुन गंभीर दुखापत झाली होती. घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. सुयशला अॅडमिट करण्याबाबत चौकश्या केल्यानंतर एका नातेवाईकाच्या सहकार्याने मुंबई येथे अॅडमिट करण्याचे ठरले. मुंबई येथे दवाखान्यात दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी सुयशच्या तपासण्या केल्यानंतर काळा पडलेला निम्मा हात कट करावा लागेल असे सांगितले.
सुयश जाधव हा वाचणे गरजेचे हे ओळखुन हात कट करण्यास परवानगी दिली. दुसरा हात लोंबकळत असलातरीही तो जोडला जाऊ शकतो, असा विश्वास डांक्टरांनी दाखवला होता. त्याप्रमाणे एक हात निम्मा कट करण्यात आला, तर दुसरा हात काही आशा असल्याने जोडला तो फक्त एका शिरेवर राहिला होता. पण त्या हाताचे ड्रेसिंग करत असताना एकमेव शिरेला धक्का बसून शिरच तुटून निघाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. यावेळी डाॅक्टरांनी हाही हात निम्यातून कट करावा लागेल असे सांगितले.
नारायण जाधव व सौ. सविता जाधव यांच्या अश्रूंचा बांद फुटला अश्रुंच्या धारा वाहिल्या यावेळी डाॅक्टरांनी सांगीतलेकी आपला सुयश महत्वाचा आहे त्याला वाचवणे गरजेचे आहे. दोन्ही हात अर्धवट कट केल्याने नारायण जाधव सरांचे आंतराष्ट्रीय खेळाडू बनवण्याचे स्वप्न हवेतच विरले होते. पण नारायण जाधव यांनी जिद्द सोडली नाही. सुयश दोन्ही हाताने अपंग असतानाही त्याला जलतरण र्स्पधेसाठी तयार केले. त्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर पांगरी, वेळापूर गावाचे नाव मोठे केले.
संकलन – महादेव जाधव, वेळापूर, सुराज्य डिजिटल