Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: heavy traffic सोलापूर | चार दिवसात दुसरी घटना; जड वाहतुकीत चिमुकल्याचा बळी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

heavy traffic सोलापूर | चार दिवसात दुसरी घटना; जड वाहतुकीत चिमुकल्याचा बळी

Surajya Digital
Last updated: 2023/01/27 at 4:10 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
असद अल्ताफ बागवान
असद अल्ताफ बागवान
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू, चार महिन्यात चौथा बळी; डंपर किती बळी घेणार ?

सोलापूर : जडवाहतुकीने सोलापुरात चार दिवसात दुस-या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. शहरातील अशोक चौक परिसरात आज शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास जड वाहतुकीच्या अपघातात एका तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Solapur | Second incident in four days; Toddler victim in heavy traffic Ashok Chowk

 

भरधाव वेगात निघालेल्या मालट्रकच्या चाकाखाली चिरडून या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. असद अल्ताफ बागवान (वय ३, रा. कर्जाळ, ता. अक्कलकोट) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस दलाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत मुलाचे शव शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

अशोक चौक परिसरात दुचाकी ( एमएच १३ बीएस ८३७७) स मालट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत गाडीवरील मुलगा खाली पडला अन् मालट्रकच्या चाकाखाली सापडला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील अन्य दोघेजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

मागील महिन्याभरापासून शहरात जडवाहतुकीने बळी गेलेल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे जड वाहतूक करणारे मालट्रक बिनधास्त शहरात येतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचेही सांगण्यात आले. बाह्य रस्त्यावरून जडवाहतूक करता येऊ शकते, पण इंधन वाचवण्याकरिता ही जलवाहतूक बिनदिक्कतपणे शहरातून होत आहे.

 

जड वाहतूक अपघातात आतापर्यंत अनेक लहान मुलांचा जीव गेला आहे. शहरातील जड वाहतूकीला अनेक संघटना, संस्थांसह लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे पण त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने सोलापूरकरांनी संताप व्यक्त केला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू, चार महिन्यात चौथा बळी; डंपर किती बळी घेणार ?

 

सोलापूर : शहरात  रविवारी (ता.२२ ) सायंकाळी पाचच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज पुतळाजवळ अवजड डंपर खाली चिरडून एका १० वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

ही घटना इतकी भयानक होती की,पाहणाऱ्यांचे काळीज हेलावून गेले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीपाद पवन कवडे (वय-१०) हा आपल्या आई, मुलगा व बहिणीसह शिवाजीनगर बाळे येथील पाहुण्यांच्या घरून शिंदे चौकातील आपल्या घरी एम.एच.१३.सी.व्ही.७९५६ या दुचाकीवरून परतत असताना पाठीमागून आलेल्या एम.एच.१३ सी.यु.४९८७ या डंपरने धडक दिली.

 

यात श्रीपाद पवन कवडे (वय-१०,रा.शिंदे चौक सोलापूर) याचा डंपरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळतात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करत चालकाला चोप दिला.

 

मयत श्रीपाद

नागरिकांच्या गर्दीतून डंपर काढून पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले तर मुलांचा मृतदेह सोलापूर शहारातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिंदे चौकातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #Second #incident #fourdays #Toddler #victim #heavytraffic #AshokChowk, #सोलापूर #चार #दिवस #दुसरी #घटना #जड #वाहतुक #चिमुकला #बळी #अशोकचौक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकणी बंधाऱ्यात पडलेल्या महिलेचे सरपंचाने वाचवले प्राण
Next Article सोलापुरात पार पडले माउलींच्या अश्वाचे भव्य गोल रिंगण सोहळा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?