सोलापूर : आता महापालिका कर्मचाऱ्यांना ५०० तर नागरिकांना १०० रुपये दंड करण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी विशेष आदेश काढले आहेत. आयुक्तांच्या या आदेशामुळे आता कार्यालय परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांना चाप बसणार आहे. In Solapur Municipal Corporation, the citizens including the employee who smokes will be fined, but the employee will be fined five times
सोलापूर महापालिकेतील विविध विभागात आणि परिसरात पान तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकण्याच्या प्रकारामुळे विविध विभागात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरचा संदेश देणाऱ्या महापालिकेच्या आवारातच अस्वच्छतेचे दर्शन चुकीचे आहे. दरम्यान, हा प्रकार निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी कारवाईसंदर्भात दंडात्मक कारवाईचे विशेष आदेश काढले आहेत.
या आदेशानुसार आता पान – तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ५०० रुपये तर नागरिकांना १०० रुपये दंड करण्यात येणार आहे. ही कारवाई तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● नियुक्त शिपाई सेवक करणार दंड वसूल !
महानगरपालिकेच्या मुख्य आवारातील विविध इमारती तसेच झोन कार्यालयांच्या इमारती ठिकाणी तंबाखू, तंबाखुजन्य पदार्थ खाऊन थुंकण्यास तसेच धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. या मनाई आदेशाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित कार्यालयात ज्या-त्या वेळी नियुक्त शिपाई कर्मचारी यांना या ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून १०० रुपये प्रमाणे दंडांची रक्कम वसुल करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्यात आले आहेत.
□ प्रत्येक वेळेसाठी ५०० रुपये दंड वेतनातून कपात होणार कपात !
या मनाई आदेशाचा भंग करणारी व्यक्ती आढळल्यास संबंधित ठिकाणच्या शिपाई कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीचा टाईम स्टँप फोटो काढावा व त्या व्यक्तीकडून दंडाची रक्कम वसूल करावी. दरमहा केलेल्या दंडात्मक कारवाईचा मासिक अहवाल संबंधित विभागप्रमुखांकडे सादर करावा. तसेच महापालिकेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत धुम्रपान, तंबाखू, व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळल्यास संबंधीत विभाग प्रमुखांनी प्रत्येक वेळेसाठी ५०० रुपये इतका दंड त्यांच्या वेतनातून कपात करावा व केलेल्या कारवाईचा मासिक अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, वरिष्ठांच्या कार्यालय, क्षेत्रीय भेटींच्यावेळी या आदेशाच्या अंमलबजावणीत कुचराई दिसून आल्यास शासन निर्णयानुसार संबंधित शिपाई सेवक व संबंधित विभाग प्रमुख यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे नमूद केले आहे. भांडार विभागाने दंडाचे पावती पुस्तक शिपाई सेवकास उपलब्ध करून द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे.