सोलापूर – सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरात विविध कारणावरून २ महिलासह ८ जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद शासकीय रुग्णालयात झाली आहे. 8 people poisoned Government Hospital due to various reasons in Solapur City – District area
लक्ष्मण श्रीमंत पुजारी (वय २६ रा. औज ता. दक्षिण सोलापूर) याने शुक्रवारी (ता. 27) सायंकाळी शेतात अज्ञात कारणावरून विष प्राशन केले. त्याला मंद्रूप येथे प्राथमिक उपचार करून (आई) निलावती यांनी रुग्णालयात दाखल केले.
शिवा सुरेश जाधव (वय २२ रा.मिरजगी ता. अक्कलकोट) याने शुक्रवारी सायंकाळी शेतात दारूच्या नशेत विष प्राशन केले. त्याला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले. स्वानंद दत्तात्रय सपकाळ (वय २५ रा. चिंचोळी ता.माढा) याने शुक्रवारी सायंकाळी शेतात अज्ञात कारणावरून विष प्राशन केले. त्याला माढा येथे प्राथमिक उपचार करून (आई) मंदाकिनी यांनी सोलापुरात दाखल केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रवी नागनाथ कोळी (वय २५ रा.अंकलगी ता. अक्कलकोट) याने शनिवारी (ता.28) सकाळी राहत्या घरात विष प्राशन केले. त्याला सुभाष कोळी (मामा) यांनी सोलापूरात दाखल केले. ममता राजू बुगडी (वय २८ रा. घरकुल कुंभारी,ता. दक्षिण सोलापूर) हिने शनिवारी (ता.28) दुपारी घरात फिनेल प्राशन केली. तिला भाऊ इरण्णा गादाम यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सोनू गजेंद्र गायकवाड (वय २२ रा. अंकोली ता. मोहोळ) यांनी शनिवारी (ता.28) दुपारी दारूच्या नशेत विष प्राशन केले. त्याला रवी भाऊ यांनी सोलापूरात दाखल केले. चारुशिला मनोज शिंदे (वय ३० रा. बुधवार पेठ सोलापूर) हिने शुक्रवारी रात्री घरगुती अडचणीतून विष प्राशन केली. तिला भैय्यासाहेब कांबळे (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. धर्मराज सिद्धाप्पा वनमोरे (वय ३० रा.मित्रनगर शेळगी) याने शुक्रवारी रात्री राहत्या घरात विष प्राशन केले. त्याला शिवम्मा मावशी यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले या घटनांची नोंद विविध पोलिसात झाली आहे.
याशिवाय पूजा संजय जमखंडी (वय २२ रा.विजापूर रोड) या विवाहितेने शुक्रवारी रात्री दूध समजून उंदीर मारण्याचे विषारी द्रव प्राशन केली. तर आशा दादाराव कोळेकर (वय ३५ रा.कोळेगाव ता.मोहोळ) हिने शनिवारी सकाळी नजरचुकीने झाडावर फवारणी च विषारी द्रव चुकून प्राशन केली. त्यांना देखील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.