मुंबई : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. Asaram Bapu returned to life imprisonment in rape case, girl is running Trust Gandhinagar since arrest
2013 मध्ये आसारामवर सुरतच्या एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता, तर नारायण साईवर तिच्या लहान बहिणीने बलात्काराचा आरोप केला होता. गुजरातच्या सत्र न्यायालयात सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी आसारामला दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान आसाराम दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापूंना 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक करून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात डांबलेले. या प्रकरणात आसाराम बापूंव्यतिरिक्त त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती, चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा हे देखील आरोपी आहेत.
देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारती सांभाळत आहे. आसारामच्या अटकेनंतर वडील आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत आहे.
महत्वाचे म्हणजे आसाराम याआधीच दुसर्या एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या तो जोधपूर कारागृहात बंद आहे. याआधीही जेव्हा-जेव्हा आसाराम यांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सुप्रीम कोर्टात आसारामच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली होती. म्हातारपण आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळायला हवा, असे त्यावेळी आसाराम म्हणाले होते. मात्र न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले नव्हते.
Gandhinagar Sessions Court sentenced self-styled godman Asaram to life imprisonment in connection with a decade-old sexual assault case. pic.twitter.com/UgIdHOsuiq
— ANI (@ANI) January 31, 2023
गांधीनगर येथील न्यायालयाने आसारामला आश्रमातील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. अहमदाबाद येथील आश्रमात 2001 ते 2006 दरम्यान अनेकवेळा आसाराम बापूने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार महिलेने 2013 मध्ये नोंदवली होती. त्यावेळी महिला आसारामच्या आश्रमात राहत होती. दरम्यान आसाराम सध्या एका दुसऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत आहे.
या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावलं होतं. आणि ऑगस्ट 15, 2013 ला तिच्या बलात्कार करण्यात आला. 20 ऑगस्ट 2013ला आसारामानी 15 ऑगस्ट रोजी एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली नंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला. – 23 ऑगस्ट 2013ला आसारामाविरोधात गुन्हा दाखल झाला.
31 ऑगस्ट 2013 ला आसारामला जोधपूर पोलिसांनी अटक केली, आसारामची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. पण या दरम्यान समर्थकांनी कोर्टाबाहेर गोंधळ घातला होता. नोव्हेंबर 2013 ला जोधपूर पोलिसांनी आसाराम विरोधात आरोपपत्र दाखल केलं. आसाराम आणि चार लोकांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारतर्फे 55 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांच्या परस्परविरोधी जबाबामुळे एकूण 8 पैकी एका आरोपीला साक्षीदार करण्यात आले. याशिवाय सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.