सोलापूर : दिवसेंदिवस जड वाहतुक कुणाचा ना कुणाचा बळी घेत असल्याचे चित्र गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र पोलिसांनी आता शहरात जड वाहतुकींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतलात. सोलापूर शहरातील जड वाहतूक सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. Police action on heavy traffic in Solapur city; Crime against five people, time also changed
जड वाहतुकी संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. 30) पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण महादेव देवकर (वय- २३,रा. तुळजापूर नाका,मड्डी वस्ती), सिद्धाराम गणपत पवार (वय-२६,रा. रेणुका नगर,जुळे सोलापूर), गणेश शिवयोगी देसाई (वय-३८,रा. रमण नगर,सोलापूर), राहुल लक्ष्मण अलंदे (वय-२१,रा.तळे हिप्परगा,तुळजापूर रोड) गोविंद मोहन शिंदे (वय-३२,रा.नीलम नगर,थोबडे वस्ती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा राज्यात टॉपटेनमध्ये आहे. मागील दोन वर्षांत सोलापूर शहरातील तब्बल १४९ जणांचा अपघाती मृत्यू झाला असून त्यात जड वाहतुकीमुळे सर्वाधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.
जड वाहतूक आणखी किती लोकांचे बळी घेईपर्यंत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी गप्प बसणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील लोकप्रतिनिधी त्यावर ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून आहेत. पालकमंत्री जिल्ह्यात कधीतरीच येतात, अशी अवस्था आहे. त्यामुळे संभाजी बिग्रेडने आंदोलन केले. तरीपण, प्रशासनाला जाग नाही आल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष श्याम कदम यांनी दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 कामती पोलीस स्टेशन हद्दीत उसाच्या पिकात आढळला बेवारस महिलेचा मृतदेह
विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारे शिंगोली येथील शेतातील उसाच्या पिकात बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचे कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले आहे.
आज सोमवारी ( ता. ३० ) दुपारी बाराच्या पूर्वी मयत झालेले अंदाजे २५ ते ३० वर्ष वयोगटातील रंगाने गोरी असणारी व पाच फूट दोन इंच बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.
अधिक चौकशीसाठी कामती पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन कामती पोलिसांकडून करण्यात आले आहे.
□ कारखान्याच्या खोलीत मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – कामावर गेलेल्या एका ४० वर्षीय मजुराने कारखान्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गांधीनगर येथील राठी कारखान्यात सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
खाजेंद्र उर्फ किरण रमेश गजम (वय ४० रा. गांधीनगर अक्कलकोट रोड) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो राठी यांच्या कारखान्यात वार्पर म्हणून काम करीत होता. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. दहा वाजेच्या सुमारास कारखान्यातील वरच्या खोलीत त्याने छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णाला दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला. मयत गज्जम याच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत .