वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दुबईच्या रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज त्यांचे निधन झाले. मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 या कालावधीत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कारभार सांभाळला. मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. Former President, Kargil war villain Pervez Musharraf passed away Islamabad Pakistan
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची आगळीक केली होती. भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धात असीम शौर्य दाखवले होते. तर याच युद्धाला मुशर्रफ यांचे कट कारस्थान म्हणून ओळखले जाते. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी मुशर्रफ यांनी कारगिलचे युद्ध छेडले होते. या युद्धातील पराभवाचे खापर मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर फोडले होते.
परवेज मुशर्रफ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आज त्यांची प्रकृती जास्त खालावली यानंतर त्यांचे निधन झाले. परवेझ मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न सांगता भारताविरुद्ध कारगिल युद्ध सुरू केले होते. लष्करप्रमुख असताना त्यांनी सत्तापालट करून पाकिस्तानात मार्शल लॉ जाहीर केला होता. 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यानंतर मुशर्रफ यांनी अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले होते.
Former President of Pakistan, General Pervez Musharraf (Retd) passes away after a prolonged illness, at a hospital in Dubai: Pakistan's Geo News pic.twitter.com/W1fGRVb6xZ
— ANI (@ANI) February 5, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पाकिस्तानातील सर्वात भ्रष्ट लष्करी शासकांमध्ये त्यांची गणना होते. परवेझ मुशर्रफ यांच्यामुळेच भारत-पाकिस्तानमधील वैर अधिक गडद झाल्याचा दावा केला जात आहे. कारगिल युद्धाच्या वेळी परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख होते. अनेक कारगिल युद्धाबाबत मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अंधारात ठेवले होते.
मुशर्रफ यांनी देश सोडताच 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लष्करी उठाव करून पदच्युत केले. त्यावेळी नवाझ शरीफ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले होते. प्रथम त्यांनी मार्शल लॉ लागू केला आणि नंतर स्वतःला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित केले. 12 ऑक्टोबर 1999 रोजी पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव झाला. ऑक्टोबर 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मुशर्रफ यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला.
मार्च 2016 मध्ये मुशर्रफ उपचारासाठी दुबईला (Dubai) गेले होते, तेव्हापासून ते तिथे उपचार घेत होते. याआधीही त्यांच्या मृत्यूच्या बातम्या अनेकवेळा आल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्या वृत्तांचे खंडन केले होते. प्रदीर्घ आजारपणात ते अनेकदा व्हेंटिलेटरवर होते. पण यावेळी त्यांनी जीवनाशी सुरु असलेली झुंज संपवली.
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने फाशीची शिक्षा सुनावली होती.