मुंबई : 2009 ते 2019 या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीमध्ये सरासरी 286 टक्के वाढ झाली आहे. भाजप खासदार रमेश चंदप्पा जिगाजिनागी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 173 percent increase in MP Supriya Sule’s wealth, Supriya Sule reacts Love Jihad Commentary
दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे, याबाबतचा अहवाल एडीआरने दिला आहे. यात भाजपचे 43, काँग्रेसचे 10, शिवसेना व राष्ट्रवादीचे 2-2 खासदार आहेत. यात खासदार सुप्रिया सुळे यांचे ही नाव आहे. हा आरोप सुळेंनी फेटाळला आहे. ‘आपल्या संपत्तीमध्ये वाढ झालेली नाही. माझ्या संपत्तीची कागदपत्रं तपासून पाहा. ही माहिती खोटी आहे,’ अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादवरही भाष्य केलंय. आमचं घर हे सत्यशोधक आहे. हे आम्ही कृतीतून दाखवून देतो, आम्ही लिंग भेद मानत नाही. मला आणि दादाला घरात समान अधिकार आहेत, म्हणूनच मी आता अशा धार्मिक मोर्चांना विरोध करायचं ठरवलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या सत्यशोधक समाज परिषदेमध्ये बोलत होत्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तर लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लव्ह जिहाद हा खूप गंभीर विषय असून गेल्या काही दिवसांपासून मी फार मनमोकळेपणाने बोलत आहे. राज्यात मोर्चे काढण्याची एक नवी पद्धत निघाली आहे. हे मोर्चे तुम्हाला फक्त हे सांगतात की, काय खायचं, लग्न कुणाशी करायचं, एखाद्या धर्माबद्दलची माहिती त्यातून पोहोचली जाते, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्चातून करण्यात आली होती. सुप्रिया सुळे यांनी मात्र, या मोर्चाची खिल्ली उडवत लव्ह जिहादचा अर्थ मला माहीत नाही. लव्हचा अर्थ मला कळतो. जिहादचा अर्थ मला कळत नाही, असे म्हटले होते.
एक दिवस धर्मासाठी हे असले मोर्चे बंद झाले पाहिजेत, त्याला विरोध करण्यासाठीच आजची ही सत्यशोधक समाज परिषद भरल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ‘शरद पवार यांची मुलगी असल्याचा अभिमान’ दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आपल्या बालपणीची एक आठवण देखील सांगितली. मी शाळेत असताना साहेब म्हणायचे जेढी बुद्धीमत्ता तेवढेच मार्क पडतील. पण संसदेत माझा पहिला नंबर आला आणि माझा आत्मविश्वास वाढत गेला, आपण शरद पवार यांची मुलगी आहोत याचा अभिमान वाटला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.