Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । व्यापा-याच्या घरातून लाखोंची रोकड लंपास; नोकरी सोडलेला ड्रायव्हरच निघाला चोर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । व्यापा-याच्या घरातून लाखोंची रोकड लंपास; नोकरी सोडलेला ड्रायव्हरच निघाला चोर

Surajya Digital
Last updated: 2023/02/06 at 9:30 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

● घरफोडीतील ६१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Solapur. Lakhs of cash looted from merchant’s house; The driver who quit his job turned out to be a thief Pune investigation gold

Contents
● घरफोडीतील ६१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत● ड्रायव्हरला पुण्यातून घेतले ताब्यातसोलापूर : व्यापाराच्या घरात ड्रायव्हर म्हणून नोकरीला आलेल्या नोकराने व्यापा-याच्या घरात सर्व काम करत संधीचा फायदा घेत चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 चौकशीचा संशय बळावला उमाकांत अडकला

● ड्रायव्हरला पुण्यातून घेतले ताब्यात

सोलापूर : व्यापाराच्या घरात ड्रायव्हर म्हणून नोकरीला आलेल्या नोकराने व्यापा-याच्या घरात सर्व काम करत संधीचा फायदा घेत चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उमाकांत उर्फ बाबू यादव (वय-३०,रा. सुलेर जवळगे,ता. अक्कलकोट,जि. सोलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी ड्रायव्हरचे नाव आहे. याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने उमाकांत यादव याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची हकीकत अशी की, १ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास दक्षिण कसबा येथे राहणाऱ्या आशिष पद्माकर पाटोदेकर (वय-३०) यांच्या घरी झालेल्या जबरी घरफोडी झाली. यातील संशयित आरोपीस सोलापूर शहर गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत पुण्यातील सातारा रोडवरील हॉटेल उत्सव लॉज येथून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे,सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली रोख रक्कम रुपये ५० लाख ९० हजार ५०० आणि २१ तोळे सोन्याचे दागिने असा जवळपास ६१ लाख ४० हजार रुपयाचा ऐवज हस्तगत केला आहे.

 

पाटोदेकर कुटुंबीय घरगुती कामानिमित्त परगावी गेले होते. पाटोदेकर यांचे राहते घर तीन मजले असून, घराच्या कंपाउंडला लोखंडी गेट आहे. त्या कुलूप लावून व दोन्ही दरवाज्याचे कुलपाने बंद केले होते. पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम आहेत. त्याच्या चाव्या या तळमजल्यातील टीव्ही टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या होत्या. चोरी झाली तेव्हा मुख्य दरवाजाची दोन्ही कुलपे तसेच बेडरूमचे कुलूप हे तुटले नसल्याचे आढळले. त्यामुळे बनावट चावीने माहितगार व्यक्तीनेच ही चोरी केल्याचा संशय बळावला. त्या दृष्टीने पोलिस पथकाने २४ तासाच्या आत संशयित चोराला पकडले असल्याचे पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

चोरी करून तो मोटारसायकल वरून पुण्याला गेला होता. फिर्यादी मोठे व्यापारी असून त्याचा मोठा आर्थिक व्यवहार आहे. त्यांच्याकडे पाच सहा विविध प्रकारचे वेगवेगळ्या गाडीवर ड्रायव्हर आहेत. त्यातील यादव याचे मालकाशी यांचे भांडण झाले होते व त्या भांडणाचा सूड घेण्याकरिताच संशयित आरोपीने ही चोरी केल्याची शक्यता पोलीस उपायुक्त काळे यांनी यावेळी व्यक्त केली. आरोपीस ७ दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याच्या ताब्यातून रोख रक्कम व दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, नंदकिशोर सोळुंके,कृष्णात कोळी, महेश शिंदे, तात्यासाहेब पाटील, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, राजू मुदगल, कुमार शेळके, वसीम शेख, संतोष मोरे, निलोफर तांबोळी, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे, सुमित्रा बारबोले या पथकाने पार पडली.

 

》 चौकशीचा संशय बळावला उमाकांत अडकला

संशयित आरोपी उमाकांत यादव याचे शिक्षण बारावी झाले असून,तो गेल्या अडीच वर्षापासून पाटोदेकर यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांचे मालकाबरोबर भांडण झाले होते. घरफोडी केल्यानंतर तो पुण्याला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याने आपल्या इतर ड्रायव्हरकडे मालकासंदर्भात चौकशी करत होता. एकच माणूस मालकाबद्दल अनेकाकडे चौकशी करत असल्याने संशय बळावला आणि तो हाती लागला.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #Lakhs #cash #looted #merchant's #house #driver #quit #job #turned #thief #Pune #investigation #police #gold, #सोलापूर #व्यापारी #घरफोडी #लाखो #रोकड #लंपास #नोकरी #ड्रायव्हर #चोर #पोलीस #पुणे #चौकशी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अदानी उद्योग समूहाच्या चौकशीसाठी काँग्रेसचा स्टेट बँकेवर मोर्चा
Next Article Lunch Diplomacy ‘राधाश्री’वर रोहित पवारांची ‘लंच डिप्लोमसी’, राजकीय वर्तुळात खमंग चर्चा

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?