मुंबई : ‘राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकासआघाडी सरकारला शिकवू नये,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपला दिला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’वर गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीय, असा घणाघातही राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांनी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. यावरुन भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. या टीकेला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं. दिलेल्या उत्तरात चाकणकर यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळाला उजाळा दिला आहे.
‘महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करणाऱ्यांना मी आठवण करुन देते की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे. मुन्ना यादव सारख्या गुंडांला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे,’ असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.