● रांगोळीच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टीने भाविकांकडून स्वागत
सोलापूर : श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी (ता. 8) शहर परिसरातून तब्बल १४ किमीची रथ मिरवणूक भक्तिमय वातावरणात झाली. रांगोळीच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टी करीत मिरवणूक मार्गावर भाविकांनी रथाचे स्वागत अन् पूजन केले. 14 Km Chariot Procession of Shri Prabhakar Swami Maharaj in Enthusiasm Rangoli Feet Showering Devotional Welcome
सकाळी सम्राट चौकातील सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) डॉ. दिपाली काळे यांच्या हस्ते पालखी पूजा करण्यात आली. याप्रसंगी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, ट्रस्टी सदस्य वामन वाघचौरे, मोहन बोड्डू, रवी गुंड, सम्राट राऊत, रमेश देशमुख, रामभाऊ कटकधोंड, प्रभाकर कुलकर्णी, सुभाष बद्दूरकर, प्रकाश कोथिंबीरे, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालखी पूजेनंतर रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी बैलगाडीत सनई – चौघडा वाजत होता. यामागे विविध भक्ती गीते आणि भजने सादर करणारे बँड पथक होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचे शिष्य व गुरु यांच्या प्रतिमा सहा बग्गीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. यात श्री रघुनाथ प्रिय साधू महाराज, श्री बसपय्या स्वामी महाराज, श्री गुरुलिंग जंगम महाराज, श्री उमदी भाऊसाहेब महाराज, श्री तिकोटीकर स्वामी महाराज, श्री गोधडचे स्वामी महाराज, श्री माणिक प्रभू महाराज, श्री अक्कलकोट स्वामी महाराज, श्री रामदास स्वामी महाराज, सौ गुरु यशोदा माई व परमपूजनीय श्री इनामदार गुरुजी यांच्या प्रतिमांचा समावेश होता. भजनी मंडळाच्या सुरेल भजनांनी वातावरण भक्तिमय बनले होते.
भालदार – चोपदार आणि टेंभेकरांच्या मागे सजवलेली पालखी होती. यामागे सजवलेला रथ होता. तब्बल १४ किमी मार्गावर भाविकांनीच रथ ओढला. ‘श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय’, ‘जय रघुवीर समर्थ’ चा अखंड जयघोष भक्तांकडून सुरू होता.
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी फलक लावून, रांगोळ्या काढून पाणी वाटप, प्रसाद वाटप करीत पुष्पवृष्टी करून नागरिकांनी रथाचे स्वागत आणि पूजन करुन दर्शन घेतले.
रथ मिरवणूक नीला नगर येथे आल्यानंतर परंपरेप्रमाणे परमपूजनीय श्री इनामदार गुरुजी घराजवळ रथाची पूजा करण्यात आली. तेथून ही रथ मिरवणूक बाळीवेस, चाटी गल्ली, भुसार गल्ली, कुंभार वेस, कोंतम चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक, उद्योग बँक, साखर पेठ, समाचार चौक माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौक मार्गे नवी पेठ येथील श्री राम मंदिराजवळ आली. या ठिकाणी परंपरेप्रमाणे रथाला विद्युत रोषणाई करण्यात आली. येथून रथ मिरवणूक गंगा विहीर, चौपाड श्री बालाजी मंदिर, मार्गे माळी गल्ली, लोणार गल्ली, पत्रा तालीम, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, बुधवार पेठ, सम्राट चौकमार्गे पुन्हा सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विसावली. रथ मिरवणूक मंदिरात आल्यानंतर आरती, शेजारती व महाप्रसादाने पुण्यतिथीनिमित्त आयोजिलेल्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.