Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कंत्राटी कामगाराचा शॉक बसून मृत्यू; विद्युत अभियंत्यासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कंत्राटी कामगाराचा शॉक बसून मृत्यू; विद्युत अभियंत्यासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/02/09 at 5:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● मंगळवेढा येथे दोन ठिकाणी घरफोडी; ७० हजाराचे दागिने लंपास● बस स्थानकाजवळ वृद्ध महिलेस मारहाण

सोलापूर – शेतातील विद्युत डीपीवर चढून काम करताना शॉक बसून कंत्राटी कामगार जागीच मयत झाला. ही घटना कंदर (ता. करमाळा) येथे सोमवारी (ता. 6) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी संबंधित विद्युत अभियंता आणि दोघा ऑपरेटर विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. Contract worker dies of shock; A case has been registered against three people including an electrical engineer Solapur Karmala

 

गोविंद बाबुराव खोडवे (२८ रा. येलडा ता. अंबाजोगाई जि. बीड) असे मयत झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. तो सोमवारी सकाळच्या सुमारास कंदर येथील उजनी जलाशयाजवळ असलेल्या आरिफ इनामदार यांच्या शेताजवळील डीपीवर चढून काम करीत होता. त्यावेळी अचानक विद्युत पुरवठा चालू झाल्याने गोविंद हा जागीच मयत झाला होता.

 

या प्रकरणी मयताचे चुलत बंधू पंडित खोडवे यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी संबंधित विद्युत अभियंता तसेच किशोर नागनाथ तळेकर आणि ज्ञानदेव तुकाराम लोकरे (विद्युत ऑपरेटर , रा. कंदर) या तिघाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार माहुरकर करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● मंगळवेढा येथे दोन ठिकाणी घरफोडी; ७० हजाराचे दागिने लंपास

 

सोलापूर – मंगळवेढा येथील बनशंकरी कॉलनीत राहणाऱ्या श्रीकांत दिलीप ढगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने ७० हजाराचे दागिने पळविले. ही चोरी सोमवारी (ता.6) सायंकाळी ५ ते ७ या सुमारास घडली. चोरट्यांनी ढगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून २० ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले. तसेच जोगेश्वरी मंगल कार्यालयाजवळ राहणारे शुभम ज्ञानेश्वर शिंदे यांचे घर अशाच पद्धतीने फोडले. मात्र त्या ठिकाणी काही चोरीस गेले नाही. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीसात झाली. हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.

● बस स्थानकाजवळ वृद्ध महिलेस मारहाण

बस मधून उतरून पायी जात असताना लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत शोभा जहांगीर भोसले ( वय६० रा. वैराग ता. बार्शी) ही महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी (ता. 8) दुपारच्या सुमारास बस स्थानकाजवळ घडली.

शोभा भोसले या वैराग येथून सोलापूर येथे एसटीने आल्या होत्या. पायी जात असताना त्यांचा भाऊ शावरू काळे त्याची पत्नी सरीता, दोन मुले गणेश आणि सुरेश आणि सुन स्वाती पिंटू भोसले यांनी पूर्वीच्या भांडणावरून मारहाण केली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Contract #worker #dies #shock #case #registered #threepeople #electrical #engineer #Solapur #Karmala
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सात रस्त्यावर ठेकेदाराच्या अपहरणाचा प्लॅन फसला; सात महिलावर दरोड्याचा गुन्हा दाखल
Next Article डफरिन हॉस्पीटलमध्ये 24 तास सेवा आणि दररोज सुमारे 50 प्रसूतीची राहणार सोय

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?