करमाळा : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये ‘ क ‘ वर्ग नगरपरिषदांमध्ये सोलापूर जिल्ह्यातून करमाळा नगरपरिषदेचा प्रथम क्रमांक आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत करमाळा शहराचा जिल्ह्यात ‘क ‘वर्ग शहरात प्रथम, राज्यात 22 वा, पश्चिम भारतात वेस्ट झोनमध्ये 29 वा क्रमांक आला आहे. या यशाबद्दल नगरपरिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नगराध्यक्ष वैभव जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार व सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी , सफाई कर्मचारी व विशेष करून सर्व करमाळा शहरवासीयांनी केलेल्या सहकार्यामुळे व दिलेल्या योगदानामुळे नगरपरीषद हे यश प्राप्त करू शकली असे गौरवोदगार जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी काढले .